आगीत एटीएमसहित पैशाचा झाला कोळसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 00:58 IST2019-03-31T00:58:39+5:302019-03-31T00:58:48+5:30
एटीएम केंद्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोंढवा अग्निशमन दलाने त्वरित आग विझवली व जवळपासच्या दुकाने व घरे यांना आगीच्या धोक्यातून वाचविले

आगीत एटीएमसहित पैशाचा झाला कोळसा
उंड्री : उंड्री येथे एचडीएफसी बँकेच्या एटीएमला लागलेल्या आगीत एटीएम मशिन जळून खाक झाले. एटीएमला केंद्राला लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून एटीएम मशिनमधील असलेली रोख रक्कमसुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे.
एटीएम केंद्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोंढवा अग्निशमन दलाने त्वरित आग विझवली व जवळपासच्या दुकाने व घरे यांना आगीच्या धोक्यातून वाचविले. उंड्री येथील कडनगर भागात असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावर हे एचडीएफसी बँकेचे हे एटीएम आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास रस्त्यावरून जाणाया व एटीएमच्या शेजारी असलेल्या दुकानांना एटीएममधून धूर व जाळाचे लोट येताना दिसले. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले व संपूर्ण दुकान पेटले. यानंतर अग्निशमन दलाला कळविण्यात आले. दुकानाच्या बाहेरील बाजूस लावलेले एसी युनिटनेसुद्धा पेट घेतला. काही तरुणांनी एसी युनिटची आग त्वरित विझवली, ज्यामुळे दुकानाच्या बाहेर आग पसरली नाही. येथे सुरक्षारक्षक तैनात नव्हता.