कश्मीर में इतनी आग नहीं लगी, जितनी दिखाई जाती है : प्राण किशोर कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 06:09 PM2018-12-04T18:09:49+5:302018-12-04T18:11:53+5:30
कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती है’ असे मत ज्येष्ठ लेखक व रेडिओ कश्मीरचे माजी प्रमुख प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केले.
पुणे : कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती है’ असे मत ज्येष्ठ लेखक व रेडिओ कश्मीरचे माजी प्रमुख प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केले.
प्राण किशोर कौल यांनी लिहलेल्या ‘रेडिओ कश्मीर अॅन्ड माय डेज इन ब्रॉडकास्टींग’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. तत्पूर्वी प्राण किशोर कौल यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. यावेळी जम्मू कश्मीर कला, संस्कृती आणि भाषा अकादमीचे उपाध्यक्ष व आमदार जफर इकबाल मनहास, दुरदर्शनचे माजी अतिरिक्त महासंचालक अशोक जेलखानी, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते. कौल म्हणाले, आम्ही सांस्कृतिक क्षेत्रातील माणसं असल्याने आमचा राजकारणाशी संबंध नाही. राजकारण्यांनी चुकीच्या पध्दतीने केलेल्या राजकारणाने कश्मीरला खाऊन टाकले. हे राजकारण थांबविले तर देशाचे कल्याण होईल. पाकिस्तानमध्ये लष्कराकडून बसविलेले लोकच सत्तेवर येत आहेत. जेव्हा तिथे लोकांनी बनविलेले खरेखुरे शासन सत्तेवर येईल तेव्हाच प्रश्न सुटू शकेल. कश्मीरचे राजकारण हे पोलिटिकल गेम आहे, यामध्ये सर्वसामान्य माणूस मात्र भरडला जात आहे.
ताश्कंद, सिमला करारानंतर आम्ही शांततेची भाषा करीत होतो, आपल्याकडील रेडिओवरून कुठेही पाकिस्तानविरोधात काही बातम्या दिल्या जाणार नाहीत याची काळजी घेत होतो. मात्र पाक व्याप्त कश्मीर आझाद कश्मीरवाले मात्र नेमके त्याच्या उलट करीत होते. कश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे राजकीय नेत्यांनी कधी गांभीर्याने पाहिले नाही. मुली-सुनांना वाचविण्यासाठी कश्मीरी पंडित तेथून पळून गेले. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही अशी खंतही कौल यांनी व्यक्त केली.
जफर इक्बाल मनहास म्हणाले, सत्ताधाऱ्यांना आम्ही सगळे शिव्या देतो मात्र सत्तेचा परिणाम सर्व घटकांवर होत असतो. धर्म, कार्पोरेट अशा सर्व क्षेत्रातही सत्ता, शासन असते. शासन असणे ही आवश्यकच बाब आहे, मात्र शासन चालविणाºया, राजकारणातील व्यक्ती योग्य असणे तितकेच गरजेचे आहे. मात्र शासन चालविणारे लोकच सध्या प्राब्लेम बनले आहेत.