पुण्यात पाऊस आला
By Admin | Published: September 10, 2015 04:08 AM2015-09-10T04:08:41+5:302015-09-10T04:08:41+5:30
पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविलेल्या पावसाने बुधवारी दमदार पुनरागमन केले. शहरात ११.२ मिलिमीटर बरसून पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी पुण्याची जीवनवाहिनी
पुणे : पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळविलेल्या पावसाने बुधवारी दमदार पुनरागमन केले. शहरात ११.२ मिलिमीटर बरसून पावसाळी वातावरण निर्माण झाले असले, तरी पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील ४ धरणांत मिळून तब्बल १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वरसगाव धरण परिसरात सर्वाधिक ४८ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
पुण्यात मंगळवारपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते; मात्र तो पाऊस टिकला नाही. आज मात्र दुपारपासून सरीवर सरी कोसळत होत्या. शहराच्या काही भागांत तर पावसाचा जोर अधिक होता. प्रामुख्याने कोथरूड, सिंहगड रस्ता, धायरी, पौड रस्ता या पसिरात मुसळधार पाऊस झाला. धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने पुण्यात पाणीकपात लागू (पान ८ वर)