अकाउंटमध्ये होते साडेचार लाख फसवणूक झाली १९ लाखांची
By भाग्यश्री गिलडा | Published: October 29, 2023 04:25 PM2023-10-29T16:25:38+5:302023-10-29T16:26:07+5:30
पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून फसवणूक
पुणे : सायबर क्राईम हेड बोलत असल्याचे भासवून तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले आहेत, असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार वानवडी परिसरात घडला आहे. तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर साहित्य सापडले आहे असे सांगून सायबर चोरट्यांनी तब्बल १९ लाख ४८ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले.
अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांना अज्ञाताने १४ ऑक्टोबर २०२३ रोजी संपर्क साधला. तुमच्या नावाने जे पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये अमली पदार्थ आहे. तसेच तुमच्या विरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे सांगितले. यावर तुम्हाला पुढील कारवाई टाळायची असेल तर तुमचे बँक खाते व्हेरिफाइड करावे लागेल असे सांगून त्यासाठी एक लिंक पाठवली. लिंकवर क्लिक केल्याने सायबर चोरट्यांना फिर्यादींच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळाला.
याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारका विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक पाटणकर पुढील तपास करत आहेत.
अशी घ्या काळजी?
- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.
- असा फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा.
- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.