बारामतीत तालुक्यात होणार १३६ पाणंद रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:45+5:302021-03-27T04:11:45+5:30
सुपे : बारामती तालुक्यात १३६ पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यासाठी स्वतःहून पुढे येण्याचे ...
सुपे : बारामती तालुक्यात १३६ पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यासाठी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांनी केले.
पानसरेवाडी (ता. बारामती) येथील कदमवस्तीवर पाणंद रस्त्याचे भूमिपूजन विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे, सरपंच राजेंद्र पानसरे, मंडलाधिकारी राहुल जगताप, तलाठी एन. जे. यादव, सहायक भागवत, माजी उपसरपंच आप्पासाहेब तरटे, सचिन कदम, जिवराज काळखैरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की तालुक्यात एक ते दीड किलोमीटरचे सुमारे १३६ पाणंद रस्ते तयार करण्याचे उद्दिष्टे आहे. यापैकी २१ रस्ते पूर्ण झाले असून राहिलेले रस्ते मे अखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नकाशावर असलेले अथवा शेतकऱ्यांच्या पूर्ण सहमतीचे रस्ते तयार होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
फोटो - पानसरेवाडी येथे पाणंद रस्त्याचे भूमिपूजन तहसीलदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.