पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 09:01 PM2020-02-24T21:01:59+5:302020-02-24T21:16:30+5:30
पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणारपुणे : पुण्याला लवकरच चंदीगड व इंदौर शहरांसाठी विमान उड्डाण होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) या विमान उड्डाणांना मान्यता दिली आहे.
पुण्यातून चंदीगड व इंदौर शहरांसाठी थेट विमान उड्डाण होणारपुणे : पुण्याला लवकरच चंदीगड व इंदौर शहरांसाठी विमान उड्डाण होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) या विमान उड्डाणांना मान्यता दिली आहे. त्यानुसार चंदीगडचे उड्डाण १५ मार्चला तर इंदौरचे उड्डाण १ मे रोजी होणार आहे.
मागील वर्षी चंदीगड व इंदौर या शहरांसाठी असलेली विमानसेवा बंद झाली होती. त्यामुळे प्रवाशांकडून सातत्याने नवीन विमानसेवेची मागणी केली जात होती. आता इंडिगो कंपनीकडून दोन्ही शहरांसाठी ही सेवा सुरू केली जाणार आहे. दि. १५ मार्च रोजी सकाळी ११.३५ वाजता चंदीगड विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण होईल. हे विमान दुपारी २.०५ वाजता पुण्यात पोहचेल. तर तेच विमान पुणे विमानतळावरून दुपारी ३.३५ वाजता उड्डाण करून सायंकाळी ६.०५ वाजता चंदीगढमध्ये उतरेल. इंदौर विमानतळावरून दि. १ मे रोजी रात्री ११.२५ वाजता विमान पुण्याकडे रवाना होईल. हे विमान दि. २ मे रोजी मध्यरात्री १२.४० वाजता पुण्यात येईल. तर मध्यरात्री १.२५ वाजता पुणे विमानतळावरून उड्डाण करून २.३० वाजता चंदीगढमध्ये दाखल होईल.
चंदीगढ व इंदौर या दोन्ही शहरांसाठी विमानसेवा सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांसह पुण्यातील उद्योग-व्यवसायाला एकप्रकारची चालना मिळणार आहे. या क्षेत्रातील प्रवाशांना थेट विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने त्याचा चांगला प्रतिसादही मिळेल, अशी अपेक्षा विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.