पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी मदतनीस असणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:08+5:302021-09-05T04:14:08+5:30
पुणे: लोहगाव विमानतळावर प्रवाशांना जर कोणती मदत लागली, तर त्यांच्यासाठी आता मदतनीस उपलब्ध असणार आहे. नुकतेच पुणे विमानतळावर ...
पुणे: लोहगाव विमानतळावर प्रवाशांना जर कोणती मदत लागली, तर त्यांच्यासाठी आता मदतनीस उपलब्ध असणार आहे. नुकतेच पुणे विमानतळावर मीट आणि ग्रीटचे काऊंटर सुरू करण्यात आले आहे. यात प्रवाशांचे सामान उचलणे, त्यांना बोर्डिंगच्या वेळी मदत करणे शिवाय तपासणीच्या वेळी मदत केली जाणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांना दोनशे रुपये मोजावे लागणार आहे.
पुणे विमानतळावर पहिल्यांदाच ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. याचा थेट फायदा ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांना होणार आहे. एका खासगी संस्थेच्या मदतीने ही सेवा पुरवली जात आहे. यासाठी १५ ते २० कर्मचारी उपलब्ध असतील. प्रवाशांचा जसा प्रतिसाद लाभेल त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. पुणे विमानतळावरून साधारणपणे १० ते १२ हजार प्रवासी रोज प्रवास करतात. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील अधिक आहे. नव्या सुविधेमुळे प्रवाशांना चांगली मदत होणार आहे.
कोट :
पहिल्यांदाच पुणे विमानतळावर मीट आणि ग्रीट ही सुविधा सुरू करण्यात आली. याचा प्रवाशांना निश्चितच फायदा होईल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार यात काम करणाऱ्या कामगाराच्या संख्येत वाढ केली जाईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ