अखेर जंबो कोविड रुग्णालयात दादागिरी करणाऱ्यांची होणार चौकशी. अजित पवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 06:32 PM2021-04-24T18:32:04+5:302021-04-24T18:32:40+5:30

कोणाचीही दादागिरी खपवुन घेतली जाणार नाही : अजित पवार

there will be an inquiry into the gangsters at Jumbo Kovid Hospital. Ajit Pawar's announcement | अखेर जंबो कोविड रुग्णालयात दादागिरी करणाऱ्यांची होणार चौकशी. अजित पवारांची घोषणा

अखेर जंबो कोविड रुग्णालयात दादागिरी करणाऱ्यांची होणार चौकशी. अजित पवारांची घोषणा

Next

जम्बो कोव्हीड हॅास्पीटलमध्ये दमदाटी करण्याच्या प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

 

जम्बो कोव्हीड हॅास्पिटल मध्ये महापालिकेतल्या माननीयांनी चक्क पालिकेच्याच डॅाक्टरला धमकावण्याचा प्रकार घडला होता. यामुळे त्रासलेल्या डॅाक्टरला महापौरांसमोर अक्षरश: रडु कोसळले होते. जम्बो मधले जेवणाचे कंत्राट मिळवण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप केला जात आहे. पण अशा परिस्थितीत काम करायचं तरी कसं असा सवाल जम्बोतले डॅाक्टर विचारत आहेत. 

 

पुण्यातल्या जम्बो कोव्हीड सेंटर मध्ये जात महापालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी इथल्या डॅाक्टर आणि संचालकांना धारेवर धरले. यातल्या एका माननीयांची भाषा तर अशी होती की महापालिकेची समन्वयक डॅाक्टर म्हणून काम करणाऱ्या या महिलेला अक्षरश: रडु कोसळले. या सगळ्या प्रकाराची तक्रार घेवुन डॅाक्टरांनी थेट महापालिका गाठत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यातले एक माननीय हे वारंवार त्रास देत असल्याचा आरोप महिला डॅाक्टर ने केला. 

महापालिकेकडुन चालवल्या जाणाऱ्या जम्बो मध्ये जेवणाचे कॅान्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीच हा सगळा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे. महत्वाचे म्हणजे सध्या १८० रुपयांनी जेवण मिळत असताना एका कार्यकर्तीला हे कॅानट्रॅक्ट ३०० रुपयांवर हवे आहे. त्यामुळेच हा धमकावण्याचा प्रकार झाल्याची चर्चा आहे.

आता या संपुर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. अजित पवार म्हणाले “ हा नेमका काय प्रकार आहे ते मला माहित नव्हतं. मात्र या प्रकरणाची पुर्ण चौकशी केली जाईल. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. विभागीय आयुक्तांबरोबर याबाबत चर्चा करणार आहे”

Web Title: there will be an inquiry into the gangsters at Jumbo Kovid Hospital. Ajit Pawar's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.