संयुक्त पूर्व परीक्षा होणार, प्रवेश पत्र काढून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:12 AM2021-04-08T04:12:17+5:302021-04-08T04:12:17+5:30
राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ११ एप्रिल रोजी होणार आहे. ...
राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ११ एप्रिल रोजी होणार आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे.
परीक्षा नियोजित तारखेला घ्यावी, असा म्हणणारा दुसरा एक गट विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यातच एमपीएससीने बुधवारी परिपत्रक काढून घ्याव्यात, अशा सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून प्रमुख पत्राची प्रिंट काढून घ्यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रवेश पात्राची मुळ प्रत आणि आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, लायसन्स यापैकी कोणतेही मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत ठेवावी. तसेच परीक्षेच्या नियोजित वेळेच्या दीड तास आधी केंद्रावर उपस्थित रहावे. उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात सोडणार नाही, असेही आयोगाने नमूद केले आहे.
---
परीक्षा केंद्रात मोबाईलला बंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या नातेवाईकांनी परीक्षा केंद्राच्या आवारात गर्दी करू नये. कोरोना संदर्भात स्थानिक प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.