कर्नवडी ग्रामस्थांचे होणार स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:28+5:302021-07-25T04:10:28+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम अशा कर्नवडी गावातील ग्रामस्थांना हलविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. शनिवारी (दि. ...

There will be migration of Karnavadi villagers | कर्नवडी ग्रामस्थांचे होणार स्थलांतर

कर्नवडी ग्रामस्थांचे होणार स्थलांतर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम अशा कर्नवडी गावातील ग्रामस्थांना हलविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. शनिवारी (दि. २४) तहसीलदार शिवाजी शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी गावाला भेट दिली व येथील ग्रामस्थांना स्थलांतराबाबत सूचना दिल्या.

रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर डोंगर कपारीत असलेले कर्नवडी गावाच्या बाजूला दोन वर्षांपासून भेगा पडलेल्या आहेत. या भेगा बुजविण्यात आल्या होत्या. परंतु मुसळधार पावसाने पुन्हा भेगा पडलेल्या आहेत. हे गाव डोंगर उतारावर असल्याने कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार वेल्हे पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अभय बर्गे, अजय साळुंखे, केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी कर्नवडी गावास भेट दिली. ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामस्थांना केळद व रानवडी येथे हलविण्याच्या सूचना दिल्या.

गावातील ग्रामस्थांसमोर दोनच पर्याय आहेत

केळद गावातील प्राथमिक शाळेत ग्रामस्थांची सोय करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पण कर्नवडी गाव मढेघाटाच्या खोल दरीत बसलेले आहे. घाट चढून केळदला आणणे शक्य नसल्याने रानवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मंदिर या ठिकाणी प्रशासनाकडून ग्रामस्थांना हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु रानवडी ते कर्नवडी रस्त्यावर रस्ता खचला असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. महाड येथील तळये गाव जवळच असून येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. पूरमय परिस्थिती आहे. लवकरच तेथील दरड भरून येथील ग्रामस्थांना हलविण्यात येणार असल्याचे या वेळी तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी सांगितले. केळदचे सरपंच रमेश शिंदे यांनी कर्नवडी येथे थांबून रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

फोटो : कर्नवडी (ता. वेल्हे) येथील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी ग्रामस्थांना सूचना देताना तहसीलदार शिवाजी शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार.

Web Title: There will be migration of Karnavadi villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.