डेंग्यूमुळे २०२० मध्ये शहरात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:10 AM2021-02-11T04:10:55+5:302021-02-11T04:10:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात २०१९ मध्ये १४०७ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. २०२० मध्ये ही संख्या ...

There will be no deaths from dengue in the city in 2020 | डेंग्यूमुळे २०२० मध्ये शहरात एकही मृत्यू नाही

डेंग्यूमुळे २०२० मध्ये शहरात एकही मृत्यू नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहरात २०१९ मध्ये १४०७ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. २०२० मध्ये ही संख्या १८३ पर्यंत खाली आली. गेल्या वर्षी कोरोनाचा कहर पाहायला मिळालेला असताना डेंग्यूचा उद्रेक मात्र जाणवला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागलेला लॉकडाऊन, लोकांचे घराबाहेर पडण्याचे नगण्य प्रमाण आणि स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे वाढलेला कल यामुळे २०२० मध्ये इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव फारसा जाणवला नाही. डेंग्यूमुळे २०२० मध्ये शहरात एकही मृत्यू झाला नाही.

पावसाळा सुरू झाला की डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. साचलेल्या पाण्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात झाल्याने डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण वाढते. मागील वर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणा अक्षरश: गॅसवर होती. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली, उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यामुळे डेंग्यू, चिकनगुिनया, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार काहीसे आटोक्यात आले.

शहरात जानेवारी-डिसेंबर २०१९ या कालावधीत १४०७ जणांना डेंग्यूची लागण झाली होती, यात १० जणांना मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मार्च-ऑगस्ट यादरम्यान डेंंग्यूचा एकही रुग्ण आढळून आला नाही. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत १८३ जणांना डेंग्यूची लागण झाली. मात्र, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

---

कुठल्या वर्षात किती पेशंट (ग्राफ)

२०१९ - १००७

२०२० - १८३

२०२१ (जाने-फेब्रु) - २४

---

सर्वेक्षणासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाचे १५ जणांचे एक पथक कार्यरत आहे. एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मिळून २५०-३०० जणांच्या टीमने २०२० साली डेंग्यूसंदर्भात सर्व्हे केला

---

डेंग्यूची लक्षणे :

अचानक तीव्र ताप येणे

तीव्र डोकेदुखी

स्नायूदुखी व सांधेदुखी

अशक्तपणा

भूक मंदावणे

जास्त तहान लागणे व तोंडाला कोरड पडणे

उलट्या होणे

दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी सुरू होणे

अंगावर पुरळ, लाल चट्टे

-----

डेंग्यूची लागण झालेल्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घ्यावी, पाणी साचणाऱ्या परिसरात नियमित स्वच्छता करावी. घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी कोरडी करून पाणी भरावे. आजार टाळण्यासाठी प्रथम स्वच्छता महत्त्वाची आहे. घरातील पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा कोरडी करावी. तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

- डॉ. अमोल नाडकर्णी, जनरल फिजिशियन

Web Title: There will be no deaths from dengue in the city in 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.