मलठणच्या विकासासाठी नीधी कमी पडणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:48+5:302021-07-16T04:09:48+5:30
टाकळी हाजी : मलठण गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन घोडगंगा सहकारी साखर कारखाण्यांचे संचालक ...
टाकळी हाजी : मलठण गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन घोडगंगा सहकारी साखर कारखाण्यांचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले .
मलठण (ता. शिरूर) येथील दलित वस्तीमधे जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांच्या माध्यमा मधून पाच लाख रुपयांच्या रस्त्यांचे भुमीपूजन राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच शशिकला फुलसुंदर उपसरपंच विनोद कदम, संदीप गायकवाड, बंटी बोडरे, माजी सरपंच विलास थोरात, पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ, माजी चेअरमन नानाभाऊ फुलसुंदर, शशिकांत वाव्हळ, मुकुंद नरवडे, ग्रामपंचायत सदस्य दिपक दंडवते, पोपट साळवे, योगेश कदम, रामचंद्र गायकवाड उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र गावडे म्हणाले की, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्यामुळे अष्टविनायक महामार्गाचे काम तसेच शिक्रापूर मलठण रस्ता, मलठण टाकळीहाजी रस्ता, मलठण शिरूर रस्ता, मलठण गारकोलवाडी रस्ता हे मोठे कामे मंजुर झाल्यांने भागाच्या विकासाला गती येणार आहे . तसेच जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी तिन शाळा खोल्या इमारती, रस्ते यासह अनेक कामे मंजूर आहेत.
यावेळी सरपंच शशिकला फुलसुंदर , संदीप गायकवाड यांचे भाषण झाले पोपट महाराज साळवे यांनी आभार मानले .
फोटो : मलठण ता शिरूर येथे रस्त्यांचे भुमिपुजन करताना सरपंच शशिकला फुलसुंदर, उपस्थित राजेंद्र गावडे व ग्रामस्थ