Pune Water Supply: शहराच्या 'या' भागात गुरुवारी पाणी येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:12 PM2022-08-01T16:12:44+5:302022-08-01T16:12:58+5:30

शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता

There will be no water in this part of the pune city on thursday | Pune Water Supply: शहराच्या 'या' भागात गुरुवारी पाणी येणार नाही

Pune Water Supply: शहराच्या 'या' भागात गुरुवारी पाणी येणार नाही

googlenewsNext

पुणे : पर्वती जलकेंद्र व लष्कर जलकेंद्र येथील देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे गुरुवार दि ४ ऑगस्ट २०२२ रोजी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.  

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती,पद्मावती,इंदिरानगर पंपींग) :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर,सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी. 

Read in English

Web Title: There will be no water in this part of the pune city on thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.