नागरिकांची हाेणार अाता कटिंग ; नव्या वर्षात केशकर्तनालय सेवांमध्ये हाेणार दरवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:31 PM2018-10-27T12:31:46+5:302018-10-27T12:33:08+5:30
महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून सलूनच्या सेवांमध्ये दरवाढ करण्यात अाली असून नव्या वर्षापासून दरवाढ लागू करण्यात येणार अाहे.
पुणे : नव्या वर्षात नागरिकांची चांगलीत कटिंग हाेणार अाहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केशकर्तनालय सेवांमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. त्यामुळे यापुढे केस कापण्यासाठी शंभर रुपये तर साध्या दाढीसाठी पन्नास रुपये माेजावे लागणार अाहेत. एक जानेवारीपासून या दरवाढीची अंमलबजावणी करण्यात येणार अाहे.
महाराष्ट्र नाभिक महामंंडळाच्या वार्षिक सर्वसाधरण सभेत सलूनला लागणाऱ्या वस्तू व काॅस्मॅटिकचा खर्च वाढला असल्याची भूमिका अनेकांनी मांडली. नाेटाबंदी अाणि वस्तू व सेवा कर या कारणांमुळे गेल्या दाेन वर्षांत सलूनच्या दरामध्ये काेणतीही वाढ करण्यात अालेली नाही. त्यामुळे नाभिक बांधवांना अार्थिक चणचण भासत अाहे. त्यामुळे या अार्थिक संकटांना सामाेरे जाण्यासाठी दरवाढ करणे गरेजेचे असल्याचे मत अनेक सदस्यांनी मांडले. त्यामुळे ही दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. या बैठकीस महामंडळाचे आजीव सभासद नानासाहेब आढाव, अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, सरचिटणीस दत्तात्रय मोरे यांच्यासह नाभिक व्यावसायिक उपस्थित होते.
सध्या पुण्यात कटिंंगसाठी 80 रुपये तर दाढीसाठी 40 रुपये अाकारले जातात.