शासकीय सुट्टीत दुय्यम निबंधक कार्यालये राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:29 AM2020-12-12T04:29:14+5:302020-12-12T04:29:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत स्टॅम्प ड्युटीवर ३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत स्टॅम्प ड्युटीवर ३ टक्के सवलत जाहीर केली आहे. या विशेष सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी पुढील सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज वाढलेले आहे. मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये दि. १२,१९,२५ व २६ डिसेंबर या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.
सह दुय्यम निबंधक बारामती, सह दुय्यम निबंधक बारामती क्र.-2, दुय्यम निबंधक आंबेगाव, दुय्यम निबंधक भोर, दुय्यम निबंधक दौंड, दुय्यम निबंधक इंदापूर, दुय्यम निबंधक नारायणगांव दुय्यम निबंधक केडगांव, दुय्यम निबंधक खेड, दुय्यम निबंधक खेड क्र.2, दुय्यम निबंधक खेड क्र.3, दुय्यम निबंधक लोणावळा, दुय्यम निबंधक मावळ, दुय्यम निबंधक मावळ क्र.2 दुय्यम निबंधक मुळशी, दुय्यम निबंधक मुळशी क्र.2, दुय्यम निबंधक जुन्नर, दुय्यम निबंधक पुरंदर, दुय्यम निबंधक शिरुर, दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे, दुय्यम निबंधक वेल्हा ही कार्यालये सुरू राहणार आहेत.