दैव बलवत्तर..पुन्हा " तिथे" च अपघात होता होता राहिला...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:53 PM2019-07-01T16:53:10+5:302019-07-01T17:16:46+5:30
कोंढवा येथील अल्कोन स्टायलिश सोसायटीची सीमाभिंत कोसळून २९ जून रोजी १५ बांधकाम मजूर ठार झाले.
कोंढवा : कोंढवा येथील अल्कोन स्टायलिश सोसायटीची सीमाभिंत कोसळून २९ जून रोजी १५ बांधकाम मजूर ठार झाले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र, सोमवारी ( आज ) अजून एक दुर्घटना होता होता राहिली, अशी धक्कादायक माहितीसमोर आली आहे. अल्कोन स्टायलिश सोसायटीला ये-जा करण्यासाठी असलेला रस्त्यावरून जात असलेला अवजड वाहतूक करणारा ट्रक (एम एच १३ वाय ९०१६) रस्ता खचल्यामुळे काल दुर्घटना झाली. त्या बांधकाम प्रकल्पाच्या खड्यात पडता पडता वाचला. त्यावेळी या ट्रकमध्ये चालक, वाहक बसलेले होते.
सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास अल्कोन स्टायलिश सोसायटीसमोर चालू असलेल्या बांधकाम प्रकल्पासाठी सिमेंटच्या विटा घेऊन येत असलेला ट्रक १५ फुटी अरुंद व चिखलाने माखलेल्या रस्ताने येत असताना अचानक २९ जूनला ज्याठिकाणी घटना घडली त्या बांधकाम प्रकल्पाच्या पत्रे लावलेल्या बाजूला खचला. ही घटना त्वरीत तालकाच्या लक्षात आल्यावर त्याने मदतीसाठी इतरांना बोलावले. ज्याठिकाणी या ट्रकमधील सिमेंटच्या विटा नेण्यात येत होत्या. त्यानी त्वरित क्रेन बोलावून ट्रक पलीकडील खड्डयात पडू नये यासाठी क्रेनच्या साह्याने ओढून धरले. त्यानंतर ट्रक तसा उभा करून त्यातील विटा त्वरित खाली करून संभाव्य दुर्घटना टाळली.