...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 03:36 PM2021-07-12T15:36:12+5:302021-07-12T15:41:52+5:30

राज्यात ईडीकडून सुरु असलेल्या राजकीय नेतेमंडळींवरील धडक कारवायांवर शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केले. 

... Therefore, there is a question mark over the actions of ED: Shivsena Leader Urmila Matondkar | ...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य

...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य

Next

पुणे : ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय नेतेमंडळींवर सुरु असलेल्या धडक कारवायांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक देखील घडताना पाहायला मिळते.  याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शरसंधान साधले आहे. 

पुण्यात उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. हे अभियान राज्यभर १२ जुलै ते २४ जुलै राबविले जाणार आहे. शिवसेना पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. राज्यात ईडीकडून सुरु असलेल्या धडक कारवायांवर भाष्य करताना मातोंडकर म्हणाल्या, ईडीकडून ठराविक लोकांवर आणि वेळ साधून कारवाई केली जात आहे. त्यामुळे ईडीच्या तपासावर प्रश्न निर्माण होत आहे. 

पुढे त्या म्हणाल्या, जिथे जिथे महाराष्ट्रमध्ये महिलांवर अन्याय होतो. त्यांच्या मागे लढायला शिवसेना आहे. संघटना काय आहे हे सत्तेत असताना जास्त चांगलं कळतं. आजच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या एवढा चांगला मुख्यमंत्री मिळाला नसता.जितकी शिवसेनेची महिला आघाडी सक्षम आहे. तितकी दुसरी कोणत्या पक्षाची महिला संघटन मजबूत नाही.सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या काय चाललं आहे  याची जाण असणं युवापिढीसाठी गरजेचं आहे.

शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चेवर आपलं मत मांडताना या चर्चा केवळ प्रसारमाध्यमात आहेत. तुम्ही लोकं यावर चर्चा करत आहात, अशी प्रतिक्रिया त्यांनी केली.

संजय राऊत 'रॉक स्टार'... 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना मातोंडकर यांनी यावर राऊतच अधिक माहिती देतील असे सांगितले. कारण त्यांना तो अधिकार आहे. मात्र, शिवसेनेत नसलेल्या व्यक्तींनी त्यावर भाष्यच करू नये. आणि संजय राऊत हे अनेक लोकांच्या टीका झेलून चोरावर मोर आहेत. ते 'रॉक स्टार' आहे. अशा शब्दात वाघ यांच्यावर निशाणा साधला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये आघाडी की स्वबळावर लढायचं हे नेतृत्व ठरवेल असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे एकमेव नेते.. 

जेव्हा देशभरातले लोक सांगत होते की आम्ही कोरोना पळवून लावला आहे. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे एकमेव नेते होते की त्यांनी दुसरी लाट येणार हे ठामपणे सांगितले होते. यावेळी ठाकरे हे टीका किंवा नकारात्मक गोष्टीवर लक्ष न देता कामातून बोलत राहिले. घराघरातच नाही तर मनामनातही शिवसेना पोहोचली आहे. महिला महिलेसाठी उभे राहते ते महत्वाचं आहे. अशी महिला आघाडी आम्हाला करायची आहे. महाराष्ट्र धर्म सगळ्यात महत्वाचा आहे.

लव्ह जिहादवर भाष्य...  

लव्ह जिहादला इथे थारा नाही. धर्म म्हणजे माणसाच्या ओळखीचं शस्त्र, पण एकांगी दृष्टीने बघायला काहीजण वातावरण बिघडवण्यासाठी काही करत असतील तर अशांकडे लक्ष न दिलेलं बरं,  अशांना हवा देऊ नये असेही मातोंडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. 


 

Web Title: ... Therefore, there is a question mark over the actions of ED: Shivsena Leader Urmila Matondkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.