या विकेंडला वर्षाविहाराला जाताय?; पुण्याजवळील या अाठ ठिकाणांचा नक्की विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 06:21 PM2018-06-09T18:21:01+5:302018-06-09T20:03:01+5:30

या विकेंडला वर्षाविहारासाठी पुण्याजवळच्या या अाठ ठिकाणांना एकदा भेट द्यायला हवीच.

these 8 places are best to visit in rainy season | या विकेंडला वर्षाविहाराला जाताय?; पुण्याजवळील या अाठ ठिकाणांचा नक्की विचार करा

या विकेंडला वर्षाविहाराला जाताय?; पुण्याजवळील या अाठ ठिकाणांचा नक्की विचार करा

Next

पुणे : मान्सूनला सुरुवात झाल्याने तरुणांची पाऊले अापाेअाप वर्षाविहाराकडे वळू लागली अाहेत. पावसात भिजत बाईकवरुन जाण्याची मजा काही अाैरच असते. शहरापासून लांब निसर्गात एखाद्या छाेट्याश्या टपरीवरील चहा सर्वांना हवाहवासा वाटताे. तुम्ही जर या विकेंडला वर्षाविहाराला बाहेर पडणार असाल तर ही अाहेत पुण्याजवळील वर्षाविहारासाठीची खास अाठ लाेकेशन्स. या ठिकाणांवर तुम्ही वर्षाविहाराचा मनसाेक्त अानंद लुटू शकता. 

1. ताम्हीणी घाट 
मुळशी अाणि ताम्हीणीला जाेडणारा असा ताम्हीणी घाट वर्षाविहारासाठी तरुणांच अावडीच ठिकाण अाहे. सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये पडणारा पाऊस, सर्वत्र दिसणारे धबधबे पर्यटकांच्या डाेळ्यांचे पारणे फेडतात. पुण्यातील चांदणी चाैकापासून अवघ्या 40 किलाेमीटर अंतरावर हा घाट अाहे. पावसाळ्यात निसर्गाने पांघरलेली हिरवी चादर पाहण्यासारखी असते. 

2. रांजन खळगे
अहमदनगर मधील निघाेज या गावात निसर्गाची  किमया पाहायला मिळते. येथील रांजण खळगे हे जगप्रसिद्ध अाहेत. या ठिकाणी नैसर्गिकरित्या काही कुंड तयार झाले अाहेत. चंद्रावर जसे खड्डे पाहायला मिळतात तसेच खड्डे या ठिकाणी तयार झाले अाहेत. त्यामुळे याला मून लॅंंडही म्हंटले जाते. पुण्यापासून 77 किलाेमीटरवर हे ठिकाण अाहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून खळखळणारे पाणी पाहण्यासारखे असते. 

 3.लवासा सिटी
तरुणाईच्या अाकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे ही लवासा सिटी. पुण्याच्या मुळशी तालुक्यात हे शहर वसविण्यात अाले असून पुण्यापासून अवघ्या 59 किलाेमीटरवर अाहे. कारने किंवा बाईकवरुन तुम्ही सहज या ठिकाणी जाऊ शकता. तब्बल 8 हजार एकरात वसवलेलं हे शहर वेस्टन कल्चरी अनुभूती देते. रंगबेरंगी घरे, बांध घालून तयार केलेेले छाेटेसे तळे मन माेहून टाकते. लवासाकडे जाण्यासाठी घाट पार करावा लागताे. या घाटात पावसाळ्याच्या दिवसात निख्खळ पांढरे धबधबे वाहतात. हा घाटाचा रस्ता तरुणांना नेहमीच भुरळ घालताे. कार एेवजी टुव्हीलरवर गेल्यास या घाटातून दिसणाऱ्या निसर्गसाैंदर्याचा अधिक अानंद लुटता येताे. झुनका भाकरी साेबतच विविध पदार्थ येथे मिळत असल्याने खवय्यांसाठीही एक वेगळीच मेजवाणी असते. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स व्हायचे असेल अाणि शांत ठिकाण हवं असेल तर तुम्ही लवासाला भेट नक्कीच द्यायला हवी. 

 

4.खडकवासला धरण 
पुण्यापासून अवघ्या 15 ते 16 किलाेमीटर अंतरावर खडकवासला धरण अाहे. पावसाळ्यातील येथील नजारा अनाेखा असताे. या ठिकाणी मिळणारी भाजलेली कणसे अाणि कांदा भजी खाण्यासाठी पर्यटकांची माेठी गर्दी असते. खासकरुन विकेंडला हा परीसर तरुणाईने फुलून गेलेला असताे. 

5. मुळशी धरण 
मुळशी धरणाजवळचा परिसर पावसाळ्यात पाहण्यासारखा असताे. मुळा नदीवर बांधलेले हे एक माेठे धरण अाहे. पावसाळ्यात या ठिकाणचे वातावरण अल्हाददायक असते. 

6. माळशेज घाट'
पश्चिम पर्वत रागांमधील माेठ्या डाेंगरांमधून माळशेज घाट जाताे. पावसाळ्यात जागाेजागी धबधबे पर्यटकांना पाहायला मिळतात. पुण्यापासून 120 किलाेमीटर वर हा घाट अाहे. माळशेज घाटातून दिसणारे निसर्गसाैंदर्य पाहण्यासारखे असते. 

7. लाेणावळा 
भारतीयांबराेबरच परदेशी नागरिकांना भुरळ लाेणावळ्याने घातली अाहे. पुण्यापासून अवघ्या 66 किलाेमीटरवर लाेणावळा अाहे. पाऊस सुरु झाला की तरुणांची पहिली पसंती लाेणावळ्याला असते. येथील धबधबे, धरणं, किल्ले नेहमीच पर्यटकांना अाकर्षिक करत अाली अाहेत. येथील चिक्की सुद्धा प्रसिद्ध अाहे. पावसाळ्यातील लाेणावळ्याचा निसर्गसाैंदर्य प्रत्येकाला हवाहवासा वाटताे. 

8. अॅम्बी व्हॅली सिटी 
लवासाप्रमाणेच अॅम्बी व्हॅली सुद्धा सुनियाेजितपणे तयार करण्यात अाली अाहे. चाैहाेबाजूंच्या पर्वत रांगांमध्ये ही सिटी अाहे. पुण्यापासून 87 किलाेमीटरवर ही सिटी अाहे. या ठिकाणी सरासरी 4 हजार मिलीमीटर इतका पाऊस पडताे. 

Web Title: these 8 places are best to visit in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.