हे आहेत पुण्यातील ब्लॅक स्पाॅट ; इथून गाडी सावधानतेने चालवा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:42 PM2018-12-22T15:42:39+5:302018-12-22T15:44:20+5:30
पुणे जिल्ह्यात एका ठिाकणी 3 वर्षांत 5 पेक्षा अधिक गंभीर अपघात झालेले 51 ब्लॅक स्पाॅट आहेत. त्यातील 22 ब्लॅक स्पाॅट हे पुणे शहरात आहेत.
पुणे : पुणे जिल्ह्यात एका ठिाकणी 3 वर्षांत 5 पेक्षा अधिक गंभीर अपघात झालेले 51 ब्लॅक स्पाॅट आहेत. त्यातील 22 ब्लॅक स्पाॅट हे पुणे शहरात आहेत. वाहतूक शाखेने या ठिकाणांची यादी केली असून पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करुन तात्काळ करता येण्यासारख्या उपाययाेजना सुचविल्या आहेत. जेणेकरुन येत्या काळात प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करता येईल.
रस्ते सुरक्षा समितीच्या निर्देशानुसार केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी परिवगन विभागाचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे व ग्रामीण पाेलीस अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी सवाद साधला. ज्या ठिकाणी वारंवार अपघात हाेतात त्या ठिकाणी काेणते बदल करणे आवश्यक आहे, हे निश्चित करुन 15 जानेवारीपर्यंत त्यात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहरात असलेले 22 ब्लॅकस्पाॅटचा अभ्यास करण्यात आला असून त्या ठिकाणी येत्या काळात सुधारणा करण्यात येणार आहेत. अशी माहिती वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली.
हे आहेत पुणे मनपा हद्दीतील ब्लॅक स्पाॅट
काेथरुड - करिष्मा चाैक
सहकारनगर- वाल्हेकर चाैक
भारती विद्यापीठ - कात्रज चाैक, दरी पूल
स्वारगेट - जेधे चाैक, डायस प्लाॅट'
मार्केटयार्ड - गंगाधाम चाैक
हडपसर - फुरसुंगी रेल्वे ब्रिज, गाडीतळ हडपसर
वानवडी - रामटेकडी चाैक साेलापूर हायवे
काेंढवा - उंड्री चाैक, खडी मशिन चाैक
विमानतळ - तेलाची माेरी, खराडी बायपास
येरवडा - हयात हाॅटेल, सादलबाबा चाैक, संगमवाडी बस पार्किंग
वारजे - मुठा नदी पूल, माई मंगेशकर हाॅस्पिटल, डुक्कर खिंड
सिंहगड राेड - वडगाव ब्रिज, नवले ब्रिज