हे अाहेत पुण्याजवळील सात फेमस वाॅटर पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:25 PM2018-04-18T12:25:42+5:302018-04-18T13:55:48+5:30

राज्यातील सगळ्याच शहरांचं तापमान वाढतय. उन्हाचा कडाका असह्य हाेताेय. त्यामुळे तुम्ही जर एखाद्या वाॅटर पार्कला जायचा विचार करत असाल तर हे सात अाहेत पुण्यातील फेमस वाॅटर पार्क्स

These are the seven Famous Waters Parks near Pune | हे अाहेत पुण्याजवळील सात फेमस वाॅटर पार्क

हे अाहेत पुण्याजवळील सात फेमस वाॅटर पार्क

googlenewsNext

पुणे : या वीकेंडला एखाद्या वाॅटर पार्कला जाण्याचा विचार करताय, तर हे अाहेत पुण्याजवळील सात भन्नाट वाटर पार्क्स. जिथे तुम्ही विविध वाॅटर राईड्सचा मनमुराद आनंद लुटू शकाल. 
कृष्णाई वाॅटर पार्क
खडकवासला व सिंहगडाच्या जवळ हा वाॅटर पार्क अाहे. प्रत्येकाच्या अावडीनुसार वेगवेगळ्या राईडस येथे पाहायला मिळतात. याबराेबरच डॅशिंग कार, व्हिडीअाे गेम्स याचाही अानंद लुटू शकता. तसेच इथे तुम्ही मुक्कामही करु शकता. 


सेंटाेसा रिसाॅर्ट वाॅटर पार्क
या वाॅटर पार्कचा अॅंबियन्स खूप छान अाहे. पुणे - मुंबई एक्सप्रेस वे जवळ हे वाॅटर पार्क अाहे. सकाळी 10 वाजल्या पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे वाॅटर पार्क सुरु असते. राहण्याची सुद्धा येथे साेय अाहे. 

अॅडलॅब्ज इमॅजिका वॉटरपार्क
जागतिक दर्जाचे असे हे वाॅटर पार्क अाहे. वेगवेगळ्या प्रकारच्या 14 वाॅटर राईड्स येथे अाहेत. पुण्यापासून 70 किलाेमीटर अंतरावर हे वाॅटर पार्क अाहे. 

पानशेत वाॅटर पार्क 
इथल्या माेकळ्या वातावरणासाठी हा वाॅटर पार्क फेमस अाहे. येथे जास्त वाॅटर राईडस नसल्यातरी नागरिकांच्या पसंतीचा असा हा वाॅटर पार्क अाहे. त्याचबराेबर येथे स्पीड बाेटिंग तसेच वाॅटर स्कूटरचाही तुम्ही अानंद लुटू शकता. 

डायमंड वाॅटर पार्क 
पुण्याजवळच्या लाेहगाव येथे हा वाॅटर पार्क अाहे. 28 प्रकारच्या वेगवेगळ्या वाॅटर राईडचा अानंद तुम्ही येथे घेऊ शकता. रेन डान्स, फॅमिली पूल असे विविध प्रकार येथे पाहायला मिळतात. सेफ्टी अाणि कस्टमर फ्रेंडली हे या ठिकाणची वैशिष्टे अाहेत. सकाळी 10.30 ते 5.30 या वेळेत हे वाॅटर पार्क खुले असते. 

स्पॅश माऊंटन वाॅटर पार्क
हा वाॅटर पार्क सुद्धा लाेहगाव जवळच अाहे. कुटुंबिय, मित्र- मैत्रिणी काेणासाेबतही तुम्ही येथे जाऊ शकतात. सकाळी 10.30 ते 5.30 पर्यंत हे वाॅटर पार्क चालू असते. 

मनाली रिसाॅर्ट वाॅटर पार्क
पुणे - साेलापूर हायवेजवळ हा मनाली रिसाॅर्ट वाॅटर पार्क अाहे. येथे सुद्धा विविध वयाच्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या वाॅटर राईड्स येेथे पाहायला मिळतात. 

Web Title: These are the seven Famous Waters Parks near Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.