असं शाेधा मतदार यादीत तुमचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 07:55 PM2019-03-28T19:55:18+5:302019-03-28T19:57:36+5:30
मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याबाबत तुम्ही साशंक असाल तर काळजी करायची गरज नाही. अगदी साेप्या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहू शकता.
पुणे : निवडणुक आता अवघ्या एका महिन्यावर आलेली आहे. सगळीकडे प्रचार सुरु झाला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांनी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही याबाबत तुम्ही साशंक असाल तर काळजी करायची गरज नाही. अगदी साेप्या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही ते पाहू शकता.
असे पहा तुमचे मतदार यादीत नाव आहे की नाही
- गुगलवर जाऊन व्हाेटर सर्च (voter search ) असे सर्च करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्याच्या निवडणुक आयाेगाची लिंक ओपन हाेईल.
- त्यात तुम्ही तुमच्या नावानुसार किंवा व्हाेटर आयडी कार्ड क्रमांकाच्या आधारे सर्च यादीतलं तुमचं नाव सर्च करु शकता.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा शाेधायचा आहे.
- त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आणि व्हेरिफिकेशनसाठी जी बेरीज करण्यास तुम्हाला सांगितली जाईल ती टाईप करायची आहे.
- त्यानंतर जर तुमच्याच नावाची अनेकजण त्या मतदार संघातील मतदार असतील तर तुम्ही त्यातून तुमच्या वयानुसार तुमचं याेग्य नाव शाेधू शकता.
- त्यानंतर त्या नावाशेजारी असलेल्या पीडीएफवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव कुठल्या मतदार यादीत आहे, तुमचं मतदानाचं ठिकाण काेणतं आहे, याबाबतची सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळेल. त्याचबराेबर गुगल मॅपचे लाेकेशन सुद्धा देण्यात आले असून त्याद्वारे तुम्हाला तुमच्या मतदान केंद्राचा पत्ता शाेधणे साेपे हाेणार आहे.