मदतीच्या हातांमध्ये त्यांचाही खारीचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:06 AM2021-04-29T04:06:56+5:302021-04-29T04:06:56+5:30
पुणे : त्यांच्या मालकीच्या ७ रुग्णवाहिका आहेत. त्यातल्या ४ जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करून ऊर्वरीत तीनसाठी त्यांनी पहिले २० किलोमीटर ...
पुणे : त्यांच्या मालकीच्या ७ रुग्णवाहिका आहेत. त्यातल्या ४ जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त करून ऊर्वरीत तीनसाठी त्यांनी पहिले २० किलोमीटर विनामूल्य जाहीर करून कोरोना संकटकाळातील मदतीमध्ये आपलाही खारीचा वाटा दिला आहे.
हंपलिंग भद्रे असे त्यांचे नाव. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील जवळे गावातून काही वर्षापूर्वी ते पुण्यात आले. रुग्णवाहिका भाडेतत्वावर देण्याचे काम करतात.
आपल्या मालकीच्या ४ रूग्णवाहिका त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मागणीनंतर लगेचच त्यांना दिल्या. आता ३ आहेत. त्यांना कोरोना रूग्णासाठी त्यांनी पहिले २० किलोमीटर माफ केले आहेत. या अंतराचे काहीही पैसे ते घेत नाहीत.
ईश्वरसेवा म्हणून हे काम करतो असे भद्रे यांनी सांगितले. अनेकदा तर नातवाईकांडे पैसेही नसतात. तेही माफ करून टाकतो असे भद्रे यांनी सांगितले. रुग्णाला घेऊन रात्री अपरात्री फिरावे लागते असे ते म्हणाले. अशी मदत घेतलेल्यांकडून नंतर या ऊपक्रमाला अनपेक्षित आर्थिक मदतही मिळाली अशी माहिती त्यांनी दिली.