...लेकिन वो व्यवहार में नही लाते
By admin | Published: March 17, 2017 02:26 AM2017-03-17T02:26:18+5:302017-03-17T02:26:18+5:30
पुणे के लोगों मे पानी के बारे में समझ बहौत है, लेकिन वह व्यवहार में नही लाते, अशा शब्दांत पुणेकरांच्या पाणीवापरावर जलक्रांतीचे प्रणेते राजेंद्र सिंह
पुणे :‘‘ पुणे के लोगों मे पानी के बारे में समझ बहौत है, लेकिन वह व्यवहार में नही लाते, अशा शब्दांत पुणेकरांच्या पाणीवापरावर जलक्रांतीचे प्रणेते राजेंद्र सिंह यांनी ताशेरे ओढले. पाण्याबाबत नियोजन कसे करावे व उपाययोजनांमधून पाणी कसे वाचवता येईल, याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ यांच्या वतीने जलोत्सवा ( वॉटर फेस्टिव्हल) चे आयोजन १६ मार्च ते २३ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटरी क्लब हिल साईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा घोरपडे, रोटरी क्लब मगरपट्टा एलिटच्या अध्यक्षा शुभांगी झेंडे, रोटेरिअन सतिश खाडे. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंह म्हणाले, ‘पुणेकर पाण्याबद्दल खूप बोलू शकतात. मात्र, ते व्यवहारात आणत नाहीत. महाराष्ट्रात मोठी धरणे बांधण्यात आली आहेत. मात्र, ती बांधण्यामागचा मूळ हेतू काय होता व तो सफल झाला का, याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. जलसाक्षरता कशासाठी हवी, हे एकदा समाजून घ्यायला हवे. राजकारण्यांमध्ये सर्वांत आधी जलसाक्षरता असायला हवी. महाराष्ट्रात जलसाक्षरतेच्या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. वॉटर हार्वेस्टिंग योग्य ठिकाणीच करायला हवे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बाष्पीभवनावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.’
या वेळी प्रशांत देशमुख व मोहन पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
(प्रतिनिधी)