ना हातात बसतात ना खिशात मावतात;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:15+5:302021-08-17T04:17:15+5:30
पुणे : आजचा आधुनिक काळात कोणाकडे मोबाईल नसेल असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. वेगाने दिवसागणिक बदलणाऱ्या तांत्रिक युगात ...
पुणे : आजचा आधुनिक काळात कोणाकडे मोबाईल नसेल असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. वेगाने दिवसागणिक बदलणाऱ्या तांत्रिक युगात मोबाईलचे प्रकारदेखील बदलत आहेत. त्याप्रमाणे महागडे मोठ्या आकाराचे मोबाईल वापरणे सध्या ‘स्टेटस’चा विषय झाला आहे. मात्र असे मोबाईल ना हातात बसतात ना खिशात मावतात. त्यामुळे हातातून हिसकावणे, गहाळ होणे असे प्रकार घडत असल्याने चोरट्यांचे सोईचे ठरत आहे.
सध्याच्या घडीला मोबाईल हा आता प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. त्यामुळे मोबाईलची काळजी किंवा सांभाळणे हे देखील कर्तव्यच म्हणावे लागेल. बेजबाबदारीने ठेवलेला मोबाईल चोरटे हातोहात लंपास करीत असून चोरीच्या घटना परिसरात रोजच्याच झाल्या आहेत.
मोबाईल चोरीची घटना नवीन नसली तरी ज्यांचा मोबाईल चोरीला गेल्याने मोठे नुकसान होते. मात्र, आपला गहाळपणाही चोरट्यांना चोरीची आयती संधी देतो, याचेही प्रत्येकाने भान ठेवायला हवे. मोबाईल आपण सुरक्षित ठेवतो का, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
गर्दीच्या ठिकाणी वावरताना बहुतांश जण आपला मोबाईल हातात पकडतात. काही जण शर्टच्या, पॅन्टच्या खिशात, तर काही जण पर्स किंवा सॅकमध्ये कोंबतात. त्यांचा हा निष्काळजीपणा चोरट्यांसाठी फायदेशीर ठरतो. बसस्थानकात तर अनेकजण बसल्या ठिकाणीच मोबाईल ठेवून बसकडे धावतात. मोबाईल हातात ठेवणाऱ्यांवरही चोरट्यांचे लक्ष असते. गहाळपणा होणार हे निश्चित असल्यामुळे चोरटे लक्ष ठेवून संधी साधतात. हातातील किंवा खिशातील मोबाईल नकळत ते लंपास करतात आणि मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षातही येत नाही. चोरट्याने लगेच मोबाईल
बंद केल्याने शोधणे कठीण होऊन बसते.
- चौकट
या भागांमध्ये मोबाईल सांभाळा
- बसस्थानक
हॉटेल, रेस्टॉरंट
-महाविद्यालय
-विवाह समारंभ
- सांस्कृतिक कार्यक्रम
- भाजी मंडई
- गर्दीची ठिकाणे
शहरातील
चोरीच्या घटना
दाखल उघड
२०१९ - १९७ १०३
२०२०- १०७ ७५
२०२१ - ७३ ४५
चौकट
चोरी नव्हे , गहाळ म्हणा
एकतर फॅशन म्हणून किंवा किती मोठ्या ब्रांडचा मोबाईल वापरतो, हे दाखविण्यासाठी मोबाईल अनेक वेळा हातात वागावला जातो किंवा शर्टच्या वरच्या खिशात ठेवला जातो. आकाराने मोठे असलेले मोबाईल खिशात ठेवणे शक्य नसल्याने ते हातात घेऊनच वागवावे लागतात. त्यामुळे नकळत गहाळ होतात. किंवा ज्या ठिकाणी ठेवला तिथेच विसरला जातो. तर गर्दीतून कोणी तरी हिसकावते. अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये चोरीपेक्षा गहाळ झालेल्याच मोबाईलची तक्रार नोंदविली जाते.