त्यांनी राज्य हस्तगत केलंय; कामरा बरोबरच बोलला, वकील म्हणून मी त्याच्यासोबत - असीम सरोदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:07 IST2025-03-25T14:03:10+5:302025-03-25T14:07:37+5:30
शिंदेंना वाटत असेल की, माझी बदनामी झाली तर त्यांनी अब्रुनुकसानी दावा दाखल करावा, तस न करता त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करणं चुकीचं आहे.

त्यांनी राज्य हस्तगत केलंय; कामरा बरोबरच बोलला, वकील म्हणून मी त्याच्यासोबत - असीम सरोदे
पुणे : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, या कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भात स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून कामरावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तुझा शो सुरु इथून पुढे होऊ देणार नाही अशाही इशारा शिवसेनेकडून दिला जात आहे. त्यानंतर वकील असीम सरोदे यांनी कामराला पाठिंबा दर्शवला आहे.
“कुणाल कामराचं सोडा, शिंदे गटाच्या ‘या’ सगळ्यांवर FIR झाला पाहिजे”: अंजली दमानिया
सरोदे म्हणाले, कामराने वास्तव आणि सत्य सांगितलं आहे. कवितेच्या माध्यमातून त्याने हे मांडलं आहे. कवितेतून विरोधाभास दाखवणे किंवा उपरोध करणे ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात महत्वाच लक्षण असल्याचं म्हणतो. ते जास्त परिणामकारक असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात उपरोध करण्याला परवानगी आहे. फडणवीस यांनी स्वतः लॉ केलं आहे. कामराने कुठेही असत्य वक्तव्य केलं नाही. शिंदेंना राग येण्यासारखं काही कारण नाही. शिंदेंना वाटत असेल की माझी बदनामी झाली. तर त्यांनी अब्रुनुकसानी दावा दाखल करावा. तस न करता त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करणं अत्यंत चुकीचं आहे. मी अजूनही सांगतो कि, एकनाथ शिंदेनी संविधानाशी गद्दारी केली. तेव्हा तुम्ही कोर्टाची तोडफोड करायला गेले होते का? ही अराजकता महाराष्ट्रात चुकीची सुरु आहे. फडणवीस यांनी संविधानाचा आदर केला पाहिजे. पुढे जाऊन शिंदे जर खरच गद्दार असतील तर त्यांना सपोर्ट करणारे सुद्धा गद्दार आहेत. त्यामुळे वास्तव कुणी सांगायचं नाही. खरं कुणी बोलायच नाही असं जर कुणाचा आरोप असेल तर तो आपण समजून घ्यायला हवा.
मी वकील म्हणून कामराच्या सोबत
महापुरुषांचा अपमान केला तर निवडणूक फायदा होणार असेल तर ते लोक बोलतात. नाहीतर ते बोलत नाहीत. एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्यावर ज्या कार्यकर्त्यांना राग येतो. त्यांचं राजकीय प्रबोधन व्हावं. यांनी राज्य हस्तगत केलं आहे. राज्य मिळवलं आहे. कामराच बरोबर आहे. मी एक वकील म्हणून कामराच्या सोबत आहे.