जातीची बंधने झुगारुन त्यांनी केला सत्याशाेधक पद्धतीने विवाह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 07:48 PM2018-07-02T19:48:49+5:302018-07-02T20:07:48+5:30
पुण्यातील उच्च शिक्षित दापत्याने जातीची बंधने झुगारुन सत्यशाेधक पद्धतीने विवाह केला. या विवाहाला डाॅ. बाबा अाढाव, प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित हाेत्या.
पुणे : तुम्ही उच्च शिक्षित असाे की अशिक्षित, श्रीमंत असाे की गरीब जात तुमची पाठ साेडता साेडत नाही. जातीयता जर नष्ट करायची असेल तर अांतरजातीय व अांतरधर्मीय विवाह व्हायला हवेत असे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर अापल्या जातींचे उच्चाटन या भाषणात म्हंटले हाेते. अांबेडकरांचा हाच विचार मनाशी पक्का करत महात्मा फुलेंच्या समता भूमीत पुण्यातील दापत्याने सत्यशाेधक पद्धतीने विवाह करत जातीअंताच्या दिशेने अापली पाऊले टाकली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तरुणांची माेठी गर्दी फुले वाड्यात झाली हाेती.
सागर शिंदे अाणि माेहिणी भाेसले यांनी साेमवारी सत्यशाेधक पद्धतीने गंजपेठेतील महत्मा फुले वाडा येथे विवाह केला. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डाॅ. बाबा अाढाव, प्रा. प्रतिमा परदेशी, किशोर ढमाले, अंकल सोनवणे, सचिन बगाडे, अॅड शारदा वाडेकर यांच्यासह पुरोगामी चळवळीतील मान्यवर उपस्थित होते. सागर अाणि माेहिणी दाेघेही उच्चशिक्षित अाहेत. सुरुवातीला त्यांच्या घरातून त्यांच्या विवाहाला विराेध हाेता, परंतु दाेघांनी अापल्या घरच्यांची समजूत काढली, त्यानंतर दाेघांच्याही घरच्यांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली. विवाहावर अावाजावी खर्च न करता अापला विवाह हा महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशाेधक पद्धतीने व्हावा यावर दाेघांचेही एकमत झाले. याला त्यांच्या घरच्यांनी सुद्धा मान्यता दिली. त्यानुसार दाेघांचा विवाह पार पडला. यावेळी प्रतिमा परदेशी यांनी जातीअंताचे तसेच सत्यसाेधक विवाहाचे समकालिन महत्त्व विषद केले. डाॅ. बाबा अाढाव यांनी भारतीय संविधानाची प्रत दाेघांना भेट देऊन एकत्र राहण्याची शपथ दाेघांना दिली.
या लग्न साेहळ्याला पुराेगामी विचारांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित हाेते, तसेच जातीअंताची लढाई लढू पाहणारे अनेक तरुणही यावेळी उपस्थित हाेते. सागर म्हणाला, लाेकांनी जातीपातीची बंधने ताेडून माणसाला माणूस म्हणून पाहिले पाहिजे. विवाह हा कुठल्या जातीत नाही तर स्त्री अाणि पुरुषाचा हाेत असताे हे सर्वांनी समजून घेणे अावश्यक अाहे. अात्ताच्या तरुणांना खऱ्या अर्थाने जातीमुक्त समाज हवा अाहे. तरुणांच्या अाई-वडिलांनी त्यांच्या मुलांना समजून घेणे तितकेच गरजेचे अाहे.