कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी पळविल्या ४ लाखांच्या कोंबड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 07:21 PM2019-09-30T19:21:57+5:302019-09-30T19:26:01+5:30
चोरांनी तीन तासाने पुन्हा रिकामी टेम्पो आणुन दिला...
राजगुरुनगर : कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहन चालकाला कोयत्याचा धाक दाखवून बांधून ठेवत चोरट्यांनी कोंबडयासह टेम्पो पळविला. अंदाजे ४ लाख रुपयांच्या कोंबडया या टेम्पोत होत्या. चोरांनी तीन तासाने पुन्हा रिकामी टेम्पो आणुन दिला.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर तालुक्यतील म्हाळुगे येथील सिद्धिविनायक पोल्ट्री फार्ममधुन टेम्पोमध्ये (एमएच- ०४ जीएफ. ९५६२) या १४९७ बॉयलर कोंबडया भरल्या होत्या. मात्र, मुंबई येथे जात असताना रात्री १ वाजता पुणे -नाशिक महामार्गावर शिरोली (ता खेड ) येथे टेम्पोला मोटार सायकल आडवी लावून दबा धरुन बसलेल्या ६ अज्ञात चोरट्यांनी मुंबई मधील वडाळा येथील अक्रम मुसलीम खान (वय.२८ ), अब्दुलगणी अब्दुल (वय.२९,) टिपूसुलतान बाबासाहब शेख (वय ४५ ) यांना कोयता व चाकुचा धाक दाखवून अंधारात झाडांमध्ये बसविले. त्यांचे मोबाईल काढून घेतले. दरम्यान ३ चोरटे त्यांच्याबरोबर थांबले. इतर चोरट्यांनी कोंबड्यांसह टेम्पो पळवुन नेला. सुमारे ४ तासांनी टेम्पोमधील कोंबड्यांची चोरी करून रिकामा टेम्पो आणुन दिला. तसेच त्यानंतर चोरट्यांनी वाहन चालकाला आणि त्याच्या साथीदाराला आम्ही गेल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासाने येथून जायचं असा दम भरला....