विमानाने यायचे, चोऱ्या करायचे अन् मिळालेले पैसे बुधवार पेठेत उडवायचे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 04:52 PM2022-04-20T16:52:05+5:302022-04-20T16:58:07+5:30
पुणे : पुणे शहरात चोरीच्या घटना या नेहमीच घडत असतात. मात्र, स्वारगेट पोलिसांनी महागड्या सायकल चोरी करणाऱ्या राज्याबाहेरील चोरांना पकडण्यात यश ...
पुणे :पुणे शहरात चोरीच्या घटना या नेहमीच घडत असतात. मात्र, स्वारगेट पोलिसांनी महागड्या सायकल चोरी करणाऱ्या राज्याबाहेरील चोरांना पकडण्यात यश मिळवले आहे. हे चोर त्या सायकली विकून पैसे मिळवायचे त्यातून ऐश करण्यासाठी त्याचा उपयोग करत होते. त्याच पैशातून ते बुधवार पेठेत मजा करायला जायचे. रात्रीच्या वेळी पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत आधुनिक व महागड्या सायकली चोरून त्याची विक्री करायचा. त्या व्यक्तीला स्वारगेट पोलिसांकडून पळून जात असताना अटक केली आहे.
बुद्धदेव विष्णु बीश्वास (वय २२ वर्षे. रा. दुर्गापूर, जि. बरद्यान), पश्चिम बंगाल आणि त्याचा साथीदार जयंता हेमंत कुमार बीश्वास (वय २२ वर्ष राहणार बर्दवान, दुर्गापूर पश्चिम बंगाल) या दोघांना स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक आहे. या दोघांनी स्वारगेट, भारती विद्यापीठ, सहकार नगर, डेक्कन, व खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सुमारे ३५ च्यावर सायकली व एक बुलेट मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.