डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:51 PM2020-04-10T23:51:47+5:302020-04-10T23:53:39+5:30

डॉक्टर वापरतात तसे पर्सनल प्रोटेक्ट ईक्विपमेंट (पीपीई) किटसारखे कपडे या चोरट्यांनी परिधान केले होते...

They were came in dressed as doctors and thief in Four shops | डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

googlenewsNext
ठळक मुद्देदेहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रावेत पोलीस चौकीत अज्ञात दोन आरोपींवर गुन्हा दाखल

पिंपरी : हॅण्डग्लोव्हज, मास्कसह डॉक्टरांसारखा पेहराव करून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एक किराणा दुकान व तीन मेडिकल स्टोअर्स फोडले. चिल्लरसह १४ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. रावेत येथील शिंदे वस्ती येथे शुक्रवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. देहूरोड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रावेत पोलीस चौकीत अज्ञात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सचिन शशिकांत जरकर (वय ४०, रा. भोंडवे एम्पायर, शिंदे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शिंदे वस्ती येथे किराणा दुकान आहे. गुरुवारी दुकान बंद करून ते घरी गेले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे दुकानासमोर आले. दोन्ही आरोपी यांनी तोंडाला मास्क लावला होता. तसेच हॅण्डग्लोव्हज देखील घातले होते. त्याचप्रमाणे डॉक्टर वापरतात तसे पर्सनल प्रोटेक्ट ईक्विपमेंट (पीपीई) किटसारखे कपडे या चोरट्यांनी परिधान केले होते. त्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. काऊंटरच्या ड्रॉपमधून चिल्लर तसेच रोकड लंपास केली. तसेच इतर तीन औषध विक्रीच्या दुकानांचे देखील शटर उचकटून तेथे चोरी केली. मात्र या दुकानांत मोठी रक्कम नव्हती. 
फिर्यादी यांना शुक्रवारी सकाळी चोरीचा प्रकार दिसून आला. त्यांनी पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर रावेत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. 
दरम्यान, येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला आहे. मात्र चोरट्यांनी डॉक्टरांसारखा पेहराव केल्याने त्यांचे चेहरे फुटेजमध्ये दिसत नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन, जमावबंदी व वाहनबंदी आहे. त्यामुळे रस्ते ओस पडले असून शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. असे असतानाही चार दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी केली.

Web Title: They were came in dressed as doctors and thief in Four shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.