कोविड लस नसल्याचा चोरट्याने उठविला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:13 AM2021-08-27T04:13:41+5:302021-08-27T04:13:41+5:30

पुणे : कोराेनाविरोधी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद असल्याचा फायदा उठवून चोरट्याने लसीकरण केंद्रात शिरून चोरी केल्याचे उघड ...

The thief took advantage of the lack of covid vaccine | कोविड लस नसल्याचा चोरट्याने उठविला फायदा

कोविड लस नसल्याचा चोरट्याने उठविला फायदा

googlenewsNext

पुणे : कोराेनाविरोधी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद असल्याचा फायदा उठवून चोरट्याने लसीकरण केंद्रात शिरून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

कर्वेनगरमधील शाहू कॉलनीमधील नियोजन शाळा येथे २३ व २४ ऑगस्टदरम्यान हा प्रकार घडला.

याप्रकरणी समर्थ पवार (वय २०, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पवार हे महापालिकेच्या आरोग्य विभागात मनपा शाळेतील कोविड लसीकरण केंद्रात नोकरी करतात. सध्या कोविडची लस उपलब्ध नसल्याने हे लसीकरण केंद्र बंद आहे. लसीकरण केंद्रासाठी महापालिकेने एक संगणक दिला असून तो शाळेतील जिन्याच्या बाजूला असलेल्या खोलीत ठेवला होता. चोरट्याने या खोलीचा कडीकोयंडा उचकटून कडीकोयंड्याचा बॉक्स व संगणक असा ६० हजार रुपयांचा माल चोरून नेला.

Web Title: The thief took advantage of the lack of covid vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.