घरात शिरून गोळीबार करणाऱ्या चोरट्याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:49+5:302021-09-03T04:11:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : खडकमाळ आळी परिसरातील एका घरात शिरून घरफोडी करणारा सराईत चोरटा आणि घरमालक तरुण या ...

The thief who broke into the house was caught firing | घरात शिरून गोळीबार करणाऱ्या चोरट्याला पकडले

घरात शिरून गोळीबार करणाऱ्या चोरट्याला पकडले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खडकमाळ आळी परिसरातील एका घरात शिरून घरफोडी करणारा सराईत चोरटा आणि घरमालक तरुण या दोघात तब्बल १० मिनिटे धरपकडीचा थरार रंगला. यावेळी घरात शिरलेल्या चोरट्याने प्रतिकार करणाऱ्या घरमालकावर पिस्तुलातून ३ गोळ्या झाडल्या. चोरट्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. तरीही घरमालकाने चोरट्याला पकडून ठेवले. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेऊन आरोपीला पकडले. खडक पोलिसांनी या आरोपीला अटक केली. त्याच्याबरोबर असलेली महिला साथीदार मात्र या गडबडीत पळून गेली.

विठ्ठल वामन भोळे (वय ४७, रा. हडपसर, मूळ जळगाव) असे या चोरट्याचे नाव आहे. आवेज सलीम अन्सारी (वय २३) असे घरमालकाचे नाव आहे.

आवेज अन्सारी यांचे बालाजीनगर येथे स्नॅक सेंटर आहे. ते दुपारी एकच्या सुमारास हिना टॉवरमधील दुसऱ्या मजल्यावरील घरी आले होते. त्यांना खालच्या मजल्यावर गोंधळाचा आवाज आला. तेव्हा विठ्ठल भोळे व त्याची साथीदार महिला बॅगेत काहीतरी भरताना दिसले. त्यांना लगेच चोरटे घरात शिरल्याचे लक्षात आले. त्यांनी भोळे याला पकडले. मात्र, भोळे ने प्रतिकार करीत त्याला ढकलून देत खिशातून पिस्तूल काढले. त्याही परिस्थितीत अन्सारी यांनी त्याला पकडून मान काखेत दाबून भरली. दुसऱ्या हाताने भिंतीवर त्याचा हात आदळला. त्यामुळे त्याच्या हातातील पिस्तूल पडले. दरम्यान, भोळे याने अन्सारी यांच्या हाताला कचकचून चावा घेऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. गोळ्याचा आवाज ऐकून आजू बाजूचे नागरिक धावत आले. ते अन्सारी यांच्या मदतीला जाऊन भोळे याला पकडून ठेवले. लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी भोळेला ताब्यात घेऊन पिस्तूल हस्तगत केले. या गडबडीत भोळे याच्याबरोबरील महिला कटावणी घेऊन पळून गेली.

Web Title: The thief who broke into the house was caught firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.