सराईत चोरटे जेरबंद : साडेसहा लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:50+5:302021-05-26T04:11:50+5:30
लोणी काळभोर : घरफोडीचे तब्बल ७८ गुन्हा दाखल असलेल्या सराईत तीन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिघांकडून एक ...
लोणी काळभोर : घरफोडीचे तब्बल ७८ गुन्हा दाखल असलेल्या सराईत तीन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिघांकडून एक चारचाकी वाहनासह सहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
काळभोर जयसिंग काळुसिंग जुनी ( वय २८ ), सोमनाथ नामदेव घारुळे ( वय २४, दोघेही राहणार बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर, पुणे ) व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक ( वय २६, रा. उरुळी देवाची, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबबत हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांचे पथक गस्त उरुळी देवाची व हांडेवाडी येथे गस्त घालत असताना दुचाकीवर दोघे संशयीतपणे फिरताना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पळ काढला पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांनी त्यांचे नावे जयसिंग जुनी आणि सोमनाथ घारुळे अशी सांगितली, तर त्यांचे साथीदार बल्लुसिंग टाक याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याचाही पाठलाग केला त्यावेळी बल्लुसिंग याने पाच किमपर्यंत गाडीवर पळ काढला, त्याने तेथील डोंगारावर गाडी नेली व त्याचा तोल जाऊन तो पडला त्यानंतरही त्याने सुमारे एक किलोमीटर अंतर पळ काढला त्यानंतर मात्र आपण पकडले जाणार हे लक्षात आल्यावर मात्र त्याने स्वत:वरच ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच पकडून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचासाठी दाखल केले व तो बरा झाल्यावर त्याला अटक केली व त्याच्याकडून या तिघांकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक टीव्ही, एक डिव्हीआर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार, एक दुचाकी असा एकूण साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून जयसिंग जुनी याच्या वर ११, सोमनाथ घारुळे वर ४ तर बल्लुसिंग टाक वर ६३ गुन्हे दाखल आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून जयसिंग जुनी याच्या वर ११, सोमनाथ घारुळे वर ४ तर बल्लुसिंग टाक वर ६३ गुन्हे दाखल आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, निखिल पवार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, रोहिदास पारखे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे या पोलीस पथकाने केली आहे. --
फोटो २५ उरुळी कांचन चोरटे अटक
फोटो - जप्त मुद्देमाल व रेकॉर्डवरील अटक केलेल्या गुन्हेगारासह कल्याणराव विधाते, राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे, राजू महानोर व पोलीस पथक.