दानपेटी फोडणारे चोर सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:14+5:302021-01-25T04:12:14+5:30
: बागेतील आई तुळजाभवानी मंदिर मंदिराचे परिसरातील तीन सीसीटीव्ही फोडून मंदिरातील दानपेटीतील अंदाजे सातशे रुपये रोख ...
: बागेतील आई तुळजाभवानी मंदिर मंदिराचे परिसरातील तीन सीसीटीव्ही फोडून मंदिरातील दानपेटीतील अंदाजे सातशे रुपये रोख रक्कम चोरून नेले होते. याबाबत मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष बाळासो सुभेदार भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविलेला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस हवालदार आबा ताकवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल खांडेकर, योगेश चितारे, दराडे, होमगार्ड लावंड
बनसोडे, मदने असे माळेगाव बुद्रुक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना 1) सतीश दीक्षित भोसले (वय 35, रा. माळेगाव बुद्रुक, नागतळ, ता.बारामती) कैलास सर्जेराव भवाळ (वय 55, रा. माळेगाव बुद्रुक ) हे माळेगाव बुद्रुक परिसरात संशयितरित्या मिळून आले. त्यांची घेतलेल्या अंगझडतीत 150 रुपये त्यात 5, 2, 1 रुपयांची चलनी नाणे मिळून आले. त्या रकमेबाबत त्यांना विश्वासात घेऊन तपास करता
त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
माळेगाव येथील बागेतील आई तुळजाभवानी मंदिरातील चोरीच्या घटनेने विशेषतः महिला वर्गात प्रचंड राग होता, परंतु पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय कसोशीने तपास करून चोरांना अटक केल्याने पोलिसांवर
अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.