Pune Crime| चोरट्यांची आता तुमच्या महागड्या मोबाइलवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:45 PM2022-02-14T12:45:30+5:302022-02-14T12:46:54+5:30

विवेक भुसे पुणे : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतल्याच्या घटना यापूर्वी सर्रास घडत होत्या. प्रसंगी ...

thieves now look at your expensive mobile theft crime increases | Pune Crime| चोरट्यांची आता तुमच्या महागड्या मोबाइलवर नजर

Pune Crime| चोरट्यांची आता तुमच्या महागड्या मोबाइलवर नजर

Next

विवेक भुसे

पुणे : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतल्याच्या घटना यापूर्वी सर्रास घडत होत्या. प्रसंगी अनेकदा या जबरी चोरीत महिला जखमीही होत असत. आता यामध्ये मोबाइल चोरीची भर पडली आहे. रस्त्याने मोबाइलवर बोलत जाणाऱ्यांच्या हातातून मोटारसायकलवरून आलेले चोरटे जबरदस्तीने मोबाइल चोरून नेत आहे. शहरातील रस्त्यांवर आता मोबाइल चोरट्यांची दहशत पसरू लागली आहे. या वर्षी जानेवारी अखेर असे ११ गुन्हे दाखल झाले होते. मात्र, गेल्या ११ दिवसांतच ११ गुन्हे दाखल झाले आहेत, याशिवाय शहरात दररोज सरासरी ८० मोबाइल चोरीला जात असतात.

सुसोबन सुकेश हजरा (वय २८, रा.महर्षीनगर) हे व तीन मित्र पहाटे ४ वाजता कामावरून मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यावेळी २ मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांना लाकडी दांडक्याने जीवे मारण्याची मारण्याची धमकी देऊन, त्यांच्या खिशातील ३ मोबाइल, १ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. आकाश ज्ञानेश्वर जाधव (वय २३, रा.तळेगाव ढमढेरे) हे सकाळी साडेसात वाजता पुणे स्टेशन येथे उतरले व तेथून अलंकार चौकाकडून मोबाइलवर बोलत पायी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील २५ हजार रुपयांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला.

पुणे स्टेशन परिसरात बाहेरगावाहून आलेले, तसेच इतर ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. मोबाइलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेण्याचे प्रकार या परिसरात अधिक आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी शतपावली करण्यासाठी रस्त्याने फिरणाऱ्या व मोबाइलवर बोलत असलेल्यांना हे चोरटे लक्ष्य करीत असल्याचे आढळून आले आहे.

गेल्या वर्षी २०२१ मध्ये पुण्यात तब्बल २९ हजार ५१५ मोबाइल चोरीला गेले आहेत. त्यापैकी फक्त ४९९ मोबाइल सापडले आहेत. २०२० मध्ये २२ हजार ९४३ मोबाइल्स चोरीला गेले होते. पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावरील लॉस्ट ॲन्ड फाउंडमध्ये याची पुणेकरांनी नोंद केली होती. त्यापैकी अतिअल्प मोबाइलचा शोध पोलीस घेऊ शकले आहेत.

मोबाइल जबरी चोरी

नोव्हेंबर, २०२१ अखेर - ९०

डिसेंबर, २०२१ अखेर - ९४

जानेवारी २०२२ अखेर - १०

१२ फेब्रुवारी २०२२ अखेर - २३

फेब्रुवारी २०२१ अखेर - १५

Web Title: thieves now look at your expensive mobile theft crime increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.