बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार

By नितीश गोवंडे | Published: September 30, 2024 03:41 PM2024-09-30T15:41:00+5:302024-09-30T15:41:09+5:30

तरुणाला चार चोरटयांनी अडवून मारहाण करत शस्त्राने पायावर वार केले, चोरटे पसार झाले

Thieves on Baner Hill Nagaland youth robbed of 20,000, thieves escape | बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार

बाणेर टेकडीवर चोरट्यांचा धुमाकूळ; नागालँडच्या तरुणाला मारहाण, २० हजार लुटले, चोरटे पसार

पुणे : मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना बाणेर टेकडी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीजेंदाई कामेई (१९, सध्या रा. आनंदनगर, जुनी सांगवी, मूळ रा. नागालँड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत कामेई याने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कामेई आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी बाणेर टेकडी फिरायला गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कामेई आणि त्याच्या मित्राला चाैघांनी अडवले. त्याला मारहाण करुन चोरट्यांनी शस्त्राने पायावर वार केला. त्याच्याकडील २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले तपास करत आहेत. यापूर्वी पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडी परिसरात लुटमारीच्या घटना घडल्या होत्या.

प्रवासी तरुणाला मारहाण करुन लूट

प्रवासी तरुणाला मारहाण करुन चोरट्यांनी त्याच्याकडील पिशवी चोरून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका रविवारी मध्यरात्री घडली. याबाबत आकाश बाबासाहेब आगळे (२०, रा. विठ्ठलनगर, खराडी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरला निघाला होता. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याच्याकडे तंबाखू मागितली. तेव्हा त्याने तंबाखूचे सेवन करत नसल्याचे चोरट्यांना सांगितले. चोरट्यांनी त्याच्या डोक्यात हातोडी मारली. त्याच्याकडील पिशवी चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे करत आहेत.

Web Title: Thieves on Baner Hill Nagaland youth robbed of 20,000, thieves escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.