Pune Crime | कानगावला चोरट्यांनी धुमाकूळ, साडेआठ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 02:51 PM2023-04-20T14:51:52+5:302023-04-20T14:52:06+5:30
कानगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोड्या करून तब्बल ८ लाख ३९ हजार ७७८ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे...
पाटस (पुणे) : कानगाव (ता. दौड) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, गावातील दोन घर फोडून साडेआठ लाखांचा ऐवज लंपास केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. कानगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरफोड्या करून तब्बल ८ लाख ३९ हजार ७७८ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
कानगाव येथील राजेंद्र दशरथ गवळी यांच्या राहत्या घरातील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी लोखंडी कपाटातील तीन लाख रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ७ लाख ४० हजार ६९३ रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर विनोद दत्तात्रय फडके यांच्या घरात प्रवेश करून त्यांची आई झोपेत असताना त्यांच्या गळ्यातील ९९ हजार ८५ रुपये किमतीचे मंगळसूत्र व मिनी गंठण गळ्यातून हिसकावून दोन अज्ञात चोरटे पसार झाले.
ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, सहायक फौजदार सागर चव्हाण व पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी केली.