झोपडपट्ट्यांमध्ये गुंडांची दहशत

By admin | Published: June 17, 2015 12:55 AM2015-06-17T00:55:55+5:302015-06-17T00:55:55+5:30

झोपडपट्ट्यांमध्ये स्थानिक गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दत्तनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर

Thieves in the Slums | झोपडपट्ट्यांमध्ये गुंडांची दहशत

झोपडपट्ट्यांमध्ये गुंडांची दहशत

Next

पिंपरी : झोपडपट्ट्यांमध्ये स्थानिक गुंडांकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दत्तनगर, विद्यानगर, महात्मा फुलेनगर, नेहरुनगर भागात स्थानिक गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. एकत्रीत येऊन ते कधी वाहनांची तोडफोड करतात, तर कधी एखाद्याला मारहाण करतात. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छोटे व्यावसायिक, दुकानदार यांच्याकडे पैशांची मागणी करतात. परंतु, त्यांच्या विरोधात तक्रार करणार कोण? असे म्हणत कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. गुंडगिरीला आळा घातला जात नाही.
शहरातील राजकारणात सक्रिय, शिवाय गुन्हेगारी क्षेत्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे, अशा व्यक्तींच्या नावाचा वापर करून झोपडपट्ट्यांमध्ये दहशत माजविण्याचे प्रकार घडत आहेत. झोपडीपट्टीदादा अनेकदा नामचिन गुंडांशी संबंधित असल्याचे भासवून नागरिकांना त्रास देतात. आपला दबदबा राहावा, यासाठी त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू असतात. अनेक नगरसेवक राहण्यास उच्चभ्रू वस्तीत असले, तरी ते झोपडपट्टी भागातून निवडून येतात. राहण्यास एकीकडे, वॉर्ड दुसरीकडे, अशी स्थिती असलेले नगरसेवक तर गुंडगिरी करणाऱ्यांवरच अवलंबून असतात. कार्यकर्ते म्हणून त्यांनाच पुढे केले जाते. (प्रतिनिधी)

राजकारणात सक्रिय असलेल्या नामचिन व्यक्तीचे नाव वापरून राजरोसपणे गुंडगिरी केली जाते. हे माहिती झाले, तरी त्यांच्यावर कोणी आक्षेप घेत नाही. याचा अर्थ संबंधित व्यक्तीची त्या गुंडगिरीला फूस असते, अथवा याकडे ते जाणीवपूर्वक काणाडोळा करतात. अशा कार्यकर्त्यांमुळे संबंधित नगरसेवकाची त्या भागात तशीच प्रतिमा तयार होते. नागरिकांमध्ये वेगळा संदेश जातो. हे मात्र नगरसेवक लक्षात घेत नाहीत.

Web Title: Thieves in the Slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.