टेम्पोसह बारा लाखांचा माल चोरट्यांनी पळवला, हडपसर परिसरातील घटना
By नितीश गोवंडे | Updated: January 29, 2024 15:57 IST2024-01-29T15:56:14+5:302024-01-29T15:57:46+5:30
टेम्पो आणि कपडे असा १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून पळ काढला....

टेम्पोसह बारा लाखांचा माल चोरट्यांनी पळवला, हडपसर परिसरातील घटना
पुणे : शहरातील व्यापार्यांना टेम्पोतून कपड्यांच्या मालाची डिलेव्हरी देण्यासाठी निघालेल्या दोन कामगारांना चोरट्यांनी लुटले. टेम्पो आणि कपडे असा १२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी मारहाण करून जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
याप्रकरणी, ब्रिजेशकुमार राजमनी तिवारी (३९, रा.जोगेश्वरी वेस्ट, मुंबई) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. २८) सकाळी साडे सहाच्या सुमारास सुहाना मसाला चौक हडपसर इंडस्ट्रीयल एरिया परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कामगार वसीम खान आणि मेहफुस खान हे दोघे गोडाऊनमधून कपड्यांचा माल घेऊन पुण्यातील व्यापार्यांना डिलेव्हरी देण्यासाठी निघाले होते. दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा टेम्पो अडवला. त्यानंतर दोघांना मारहाण करत जबरदस्तीने टेम्पोमध्ये बसून टेम्पो आणि त्यातील कपडे पळवले. रेल्वे फाटकाच्या दिशेने भरधाव वेगात दोघे निघून गेले. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक खंदारे करत आहेत.