पुण्यात अशाप्रकारे करु शकता ख्रिसमस आणि नववर्षाचं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 01:20 PM2017-12-15T13:20:10+5:302017-12-15T13:32:19+5:30

पुणं आणि ख्रिसमस यांचा काय संबंध असा तुमचा समज असेल तर तो डोक्यातून काढून टाका कारण पुण्यातही ख्रिसमस आणि नववर्षाचं जंगी स्वागत केलं जातं.

things to do in pune while christmas and new year celebration | पुण्यात अशाप्रकारे करु शकता ख्रिसमस आणि नववर्षाचं जंगी सेलिब्रेशन

पुण्यात अशाप्रकारे करु शकता ख्रिसमस आणि नववर्षाचं जंगी सेलिब्रेशन

googlenewsNext
ठळक मुद्देख्रिसमसदरम्यान दरवर्षी भीमथडी येथे भरणाऱ्या या जत्रेत जवळपास जवळपास ६ हजाराहून अधिक लोक इथं भेट देतात.पुण्यातल्या काही रोडवर तुम्ही मनसोक्त ख्रिसमस स्ट्रीट शॉपिंगची मजा घेऊ शकता. तसंच तेथे अनेक शोरुम्सही आहेत.पुण्यात ख्रिसमससाठी जाणार असाल तर पुण्यातील सगळ्यात जुन्या चर्चला भेट दिल्याशिवाय ख्रिसमस कसा साजरा होईल.

पुणे : ख्रिसमस व्हॅकेशनमध्ये अनेकजण विविध ठिकाणी जाण्याचा विचार करत असतात. आता सगळीकडेच ख्रिसमिसची तयारी सुरू झालीय. चर्चपासून ते घरापर्यंत सगळीकडे रोषणाई करण्यात येईल. तुम्हीही जर आपल्या  ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर पुण्याचा विचार करू शकता. कारण पुण्यातही ख्रिसमससाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. गोवा मुंबईप्रमाणेच पुण्यातही अनेक चर्च आहेत. तसंच, कॅरोल, ख्रिसमस मास, जत्रा, शॉपिंग अशा विविध गोष्टी तुम्ही पुण्यात अनुभवु शकता. जर तुम्हीही पुण्यात जायचा विचार करत असाल तर ख्रिसमस कसा साजरा करायचा याविषयी तुम्ही आम्ही सांगणार आहोत. 

ख्रिसमस कॅम्पेन अॅट पावना लेक

ख्रिसमसला गेट-टुगेदर करण्याच्या विचारात असाल तर पावना लेकला नक्की भेट द्या. २४ ते २५ डिसेंबर दरम्यान या कॅम्पेनचं आयोजन केलं असून, लाईव्ह म्युझिक, ख्रिसमस पार्टी, टेन्ट स्टे, संगीत खुर्ची, टग ऑफ वॉर असे विविध खेळही तिथं होणार आहेत. एवढंच नव्हे तर, एक खास गिफ्टही आयोजकांकडून देण्यात येणार आहे. तुमच्या टेन्टमध्ये तुम्हाला सांताक्लॉज खास गिफ्ट देऊन जाणार आहे. पुण्यातल्या पावना लेकच्या अॅपल वॉटरफ्रंट कॅम्पेनमध्ये हे सगळे खेळ होणार आहेत. 

सिक्रेट वॉटरफॉल

कमी वर्दळीच्या ठिकाणी, चमचमत्या ताऱ्यांच्या प्रकाशात, हिरवळीच्या प्रदेशात तुम्हाला ख्रिसमस साजरा करायचा असेल तर खोपोलीत सिक्रेट वॉटरफॉलजवळ ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. हे कॅम्पेन तुमच्या गेट-टुगेदरसाठीही उत्तम असेल. टेन्टच्या बाजूला शेकोटी पेटवून तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत मनसोक्त गप्पा मारू शकाल. मुळातच खोपोलीला एक वेगळं निसर्ग सौंदर्य लाभलंय. त्यातही चांदण्याच्या प्रकाशात निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलतं. त्यामुळे अशा छान वातावरणात तुम्हालाही ख्रिसमसचं सेलिब्रेशन करायचं असेल तर याठिकाणी नक्की भेट द्या. 

आणखी वाचा - मुंबईतील या चर्चमध्ये पारंपारिक पद्धतीने साजरा करतात ख्रिसमस

सेंट मेरी चर्च

पुण्यात ख्रिसमससाठी जाणार असाल तर पुण्यातील सगळ्यात जुन्या चर्चला भेट दिल्याशिवाय ख्रिसमस कसा साजरा होईल. डेक्कनमध्ये सेंट मॅरी चर्च आहे. जवळपास १९१ वर्ष जुनं हे चर्च आहे. रात्री ११ च्या दरम्यान इथं ख्रिसमस मास सुरू होतो. रात्री १.३० वाजेपर्यंत हा मास असतो. त्यानंतर तुम्ही या चर्चला केलेली सजावट पाहू शकता. डोळे दिपतील इतक्या आकर्षक पद्धतीने सजावट केलेली असते. 

सेंट पेट्रीक कॅथड्रल

सेंट्र कॅथड्रल चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन म्हणजे एक सोशल गेटटुगेदरच असतं. जवळपास ४ हजार लोक एकाच वेळी इथं कॅरोलचं गायन करतात. त्यामुळे या चर्चमध्ये ख्रिसमसदरम्यान एक वेगळाच उत्साह दृष्टीस येतो.

आणखी वाचा - यंदाचा नाताळ आणि नववर्ष गोव्यात साजरा करणार असाल तर

ख्रिसमस शॉपिंग

पुण्यातल्या एम.जी रोडवर तुम्ही मनसोक्त ख्रिसमस शॉपिंगचा मजा घेऊ शकता. रात्रभर इथं दुकानं उघडी असतात. एवढंच नाही तर ख्रिसमसनिमित्त खास ऑफर्सही दिली जातात. एम.जी रोड तसा पाहायला गेल्यास फार वर्दळीचा आहे. तसंच हा रस्ता पुण्यातील जुना रस्ता म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे इथं गर्दी नेहमीच असते. पण ख्रिसमसनिमित्त या रस्त्यावर एक वेगळात उत्साह संचारलेला दिसतो. 

भीमथडी जत्रा

ख्रिसमसच्या दरम्यान भरणारी जत्रा म्हणजे भीमथडी जत्रा. दरवर्षी या जत्रेचं आयोजन केलं जातं. जवळपास २० स्टॉल्स इथं असतात. स्त्रियांनी आपल्या हातांनी बनवलेल्या वस्तू इथं प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवल्या जातात. शिवाजी नगरच्या कृषी विद्यापीठाजवळ ही जत्रा भरते. दरवर्षी जवळपास ६ हजाराहून अधिक लोक इथं भेट देतात. तुम्हालाही जरा वेगळ्या पद्धतीची शॉपिंग करायची असेल तर तुम्ही या जत्रेला भेट देऊ शकता. 

आणखी वाचा - यंदा न्यू इअर पार्टीसाठी पुण्यातील ही हॉटेल्स नक्की ट्राय करा

Web Title: things to do in pune while christmas and new year celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.