‘गोष्टींचा शनिवार’ उपक्रम पोहोचला २५ लाख मुलांपर्यंत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:09+5:302021-03-20T04:10:09+5:30

पुणे : ‘गोष्टींचा शनिवार’ ही वाचन मोहीम गेले ५ महिने महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवली गेली. ‘प्रथम बुक्स’चे स्टोरीविव्हर, महाराष्ट्र ...

'Things Saturday' initiative reaches 2.5 million children! | ‘गोष्टींचा शनिवार’ उपक्रम पोहोचला २५ लाख मुलांपर्यंत!

‘गोष्टींचा शनिवार’ उपक्रम पोहोचला २५ लाख मुलांपर्यंत!

Next

पुणे : ‘गोष्टींचा शनिवार’ ही वाचन मोहीम गेले ५ महिने महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवली गेली. ‘प्रथम बुक्स’चे स्टोरीविव्हर, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, एकात्मिक बालविकास सेवा आणि युनिसेफतर्फे गोष्टींमधून शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम आखण्यात आला होता. या उपक्रमाची सांगता म्हणून २० मार्च रोजी जागतिक कथा-कथन दिवसाच्या निमित्ताने आॅनलाईन कार्यक्रम होत आहे. या उपक्रमातून २५ लाख मुलांपर्यंत पोचता आले. त्यांनी दर शनिवारी गोष्टी ऐकल्या आणि त्यावर आधारित कृती-उपक्रम केले.

आॅनलाईन कार्यक्रमात ‘वाचनाचा आनंद आणि भाषा कौशल्य’ या विषयावरचा परिसंवाद होणार आहे. लेखक राजीव तांबे, जिल्हा परिषद औरंगाबादचे मुख्याधिकारी मंगेश गोंदवले, 'लँग्वेज अँड लर्निंग फाउंडेशन' चे संस्थापक धीर झिंगरान तसेच तिन्ही संस्थांचे पदाधिकारी यात सहभागी होतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थितांशी संवाद साधतील.

हा कार्यक्रम २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता ँ३३स्र२://६६६.८ङ्म४३४ुी.ूङ्मे/६ं३ूँ?५=्रू५ेुेढ्नुॠक या लिंकवर बघता येईल.

टाळेबंदीमुळे दीर्घ काळासाठी शाळा बंद आहेत. अशा वेळी मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणे, त्यांचा भाषा विकास घडवणे हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यासाठी ‘गोष्टीचा शनिवार’ ही मोहीम गेले ५ महिने सुरु होती.

या उपक्रमात राज्यातील २.३६ लाख शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच १ लाख शाळा सहभागी झाल्या. या कालावधीत १ ली ते ८ वी या वयोगटातील मुलांसाठी, मराठी, उर्दू आणि इंग्रजी या भाषांमध्ये उत्तम दर्जाच्या गोष्टींची डिजिटल पुस्तके मोफत देण्यात आली. अंगणवाड्यांसाठी आठवड्याला एक पुस्तक दिले. या पुस्तकांना रोचक कृती-उपक्रमांची जोड होती.

प्रथम बुक्स स्टोरीविव्हर टीम पुस्तकांची निवड करून व्हॉटसअ‍ॅप माध्यमातून मुख्य ग्रुपवर ही पुस्तके टाकत असे. तिथून पुढे नेटवर्कमधल्या सर्व ग्रुप्सना ती पाठवली जात. या बहुस्तरीय रचनेमध्ये पदाधिकारी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते अशी उतरंड होती. मग हे सर्वजण पुढे मुलांपर्यंत आॅनलाईन किंवा आॅफलाईन पद्धतीने मुलांपर्यंत पोचवत.

ही सर्व पुस्तके ओपन सोर्स असल्याने ती मोफत डाऊनलोड करणे, प्रिंट काढणे, पुस्तके टीव्हीच्या पडद्यावर दाखवणे सहज शक्य झाले. त्यामुळेच गडचिरोलीसारख्या ठिकाणी सायकलवरचे वाचनालयसारखे अभिनव उपक्रम करता आले. ज्यांना इंटरनेट उपलब्ध नाही, त्यांना प्रथम बुक्सच्या ‘मिस्ड कॉल द्या, गोष्ट ऐका’ या उपक्रमाद्वारे गोष्टी पोचवण्यात आल्या.

Web Title: 'Things Saturday' initiative reaches 2.5 million children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.