माणूस कसा घडेल याचा व्हावा विचार

By admin | Published: October 16, 2015 12:45 AM2015-10-16T00:45:38+5:302015-10-16T00:45:38+5:30

सध्याच्या शिक्षणातून माणूस कसा घडेल, याचा विचार करण्याची शिक्षण संस्थांना गरज असल्याचे मत भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.

Think about how a person will happen | माणूस कसा घडेल याचा व्हावा विचार

माणूस कसा घडेल याचा व्हावा विचार

Next

पिंपरी : सध्याच्या शिक्षणातून माणूस कसा घडेल, याचा विचार करण्याची शिक्षण संस्थांना गरज असल्याचे मत भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने ‘भारतीय पारंपरिक शिक्षणपद्धती- वर्तमान दृष्टी’ विषयावर आयोजित परिषदेच्या समारोपावेळी ते बोलत होते. या वेळी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश जोशी, विभाग संघचालक अप्पा गवारे, संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे, भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, गुरुकुलम प्रधानाचार्य पूनम गुजर, सहकार्यवाह विलास लांडगे आदी उपस्थित होते.
चिंचवडगाव येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे भारतीय पारंपरिक शिक्षण पद्धतीवर दोन दिवसीय सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे, गिरीश प्रभुणे, डॉ. यशवंत पाठक, वामन गोगटे, वामन अभ्यंकर, इंदुमती काटदरे, मीनल दशपुत्रे, सुभाषमहाराज गेठे, रेणू दांडेकर, महेश शर्मा, सुनील देशपांडे, डॉ. अनघा लवळेकर, डॉ. दत्तात्रय तापकीर, मिलिंद कांबळे, दिलीप केळकर, ल. का. मोहरील, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, रमेश पानसे आदींनी मार्गदर्शन केले.
पूनम गुजर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सतीश गोरडे यांनी आभार मानले. हरी भारती, रवींद्र नामदे, नितीन बारणे, गतिराम भोईर, नटराज जगताप, नीता कानिटकर आदींनी संयोजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Think about how a person will happen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.