विवेकानंदांचे विचार आचरणात आणा

By admin | Published: January 13, 2017 02:40 AM2017-01-13T02:40:42+5:302017-01-13T02:40:42+5:30

स्वातंत्र्यपूर्व काळात अज्ञान, मागासलेपणा आदींनी देशातील समाजव्यवस्था बरबटलेली असताना प्रतिकूल

Think of Vivekananda's thoughts | विवेकानंदांचे विचार आचरणात आणा

विवेकानंदांचे विचार आचरणात आणा

Next

वाकड : स्वातंत्र्यपूर्व काळात अज्ञान, मागासलेपणा आदींनी देशातील समाजव्यवस्था बरबटलेली असताना प्रतिकूल आणि खडतर काळात आधुनिक भारताचे स्वप्न पाहत त्याग आणि सहिष्णुतेच्या विचारांची संपूर्ण जगाला वेगळी ओळख करून देणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणायला हवेत, असे आवाहन भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
वाकड येथील इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स या संस्थेच्या प्रवेशद्वारात विवेकानंदांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण पाटील यांच्या हस्ते झाले. संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या भाषणात प्रतिभा पाटील यांनी विवेकानंदांच्या जीवनातील अनेक पैलूंचा उलघडा केला.
या वेळी डॉ. देविसिंह शेखावत, संस्थेचे संस्थापक संचालक एन. सी. जोशी, अध्यक्ष एस. के करंदीकर, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या अध्यक्षा मंदाकिनी जोशी, वि. आर. ताम्हणकर, सभासद अनंता झांजले, शा. बा. मुजुमदार, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजी कदम, डॉ. एस. एफ. पाटील, सुभाष जाधवर, राम ताकवले उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Think of Vivekananda's thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.