सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:38 AM2020-11-22T09:38:14+5:302020-11-22T09:38:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली असून, शुक्रवारी दिवसभरात ३७२ रूग्णांची वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली असून, शुक्रवारी दिवसभरात ३७२ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २०९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ६२८ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २४० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार ३० रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात १० मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील ३ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ४१७ झाली आहे.
दिवसभरात एकूण २०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार १६४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ६६ हजार २०९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ४१७ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार १७२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७ लाख ८१ हजार ३८० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
--------
शहरातील शाळा सुरू करावयाच्या असल्याने शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विविध स्वॅब सेंटरवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी गर्दी केली. परंतु, स्वॅब सेंटरवरील ''''''''टार्गेट'''''''' दिलेली क्षमता संपल्याने अनेक शिक्षकांना परत जावे लागले.