‘रुग्णसेवेत तृतीयपंथींना स्वतंत्र अधिकार द्यावेत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:36+5:302021-06-30T04:08:36+5:30
पुणे : समाजातील भेदभाव करण्याच्या वृत्तीमुळे आजही तृतीयपंथीयांना समान अधिकारांसाठी झगडावे लागत आहे. ट्रान्सजेंडर क्लिनिकमुळे आता स्वतंत्र उपचार मिळणे ...
पुणे : समाजातील भेदभाव करण्याच्या वृत्तीमुळे आजही तृतीयपंथीयांना समान अधिकारांसाठी झगडावे लागत आहे. ट्रान्सजेंडर क्लिनिकमुळे आता स्वतंत्र उपचार मिळणे शक्य होईल. आरोग्यातील सर्व स्तरातील रुग्णसेवेत तृतीयपंथीयांना स्वतंत्र अधिकार द्यायला हवेत, असे प्रतिपादन जॉन्स हापकीन युनिव्हर्सिटीच्या ट्रान्स हेल्थच्या संचालिका सिमरन बरूचा यांनी केले.
वायआरजी केअर पुणेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी ट्रान्स क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ॲक्सलरेट प्रकल्पाच्या माध्यमातून यू.एस. एड आणि पेपफार यांच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी व्यापक आणि एकात्मिक सेवांच्या आदर्श प्रतिमा टीजी क्लिनिकच्या माध्यमातून सेवेत येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कक्ष, एलजीबीटी सीबीओ आणि समुदाय यांचे सहकार्य लाभले आहे. पुण्यात डीम्ड युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या भागीदारीत ॲक्सेलेरेट क्लिनिकच्या माध्यमातून ट्रान्सजेंडर समुदायाला एकात्मिक सेवांचे पॅकेज प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी सोनल दळवी, चांदणी गोरे, शंकरी, वाय आर जी केअर पुणे जिल्हा समन्वयक दीपक निकम, जगदीश पाटील, सचिन नारखेडे, अमर चव्हाण, मुग्धा चिटणीस, हर्षा जाधव, वंदना सूर्यवंशी, आशिष चौधरी, अनिल उकरंडे, लतिका कर्वे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तांत्रिक तज्ञ शंकरी यांनी तर प्रकल्प क्षेत्र समन्वयक रंगनाथ जोशी यांनी केले.