जिल्ह्यात आज पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:11 AM2021-05-01T04:11:23+5:302021-05-01T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा तीसरा टप्पा उद्या शनिवार पासून सुरू होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा तीसरा टप्पा उद्या शनिवार पासून सुरू होत आहे. या साठी जिल्हा परिषदेने तयारी केली आहे. पुढील सात दिवस जिल्ह्यातील १४ केंद्रांवर प्रायोगिक स्तरावर ही मोहिम जिल्ह्यात सुरू केली जाणार आहे. यानंतर पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल, अशी माहिती आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी दिली. लसीकरणासाठी १४ केंद्रासाठी प्रतिदिन १०० लस राखीव ठेवण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने १ तारखेपासून १८ वर्षापुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुणे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी जिल्हा अरोग्य विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १४ केंद्रावर या वयोगटाचे लसीकरण होणार आहे. या साठी कोविन पोर्टलवर नाव नोंदणी करावी लागणार आहे. त्या नंतर १४ लसीकरण केंद्रांपैकी कुठल्याही एका ठिकाणी उपलब्ध स्टॉकमधून वेळ घ्यावी लागणार आहे आणि त्या वेळेत लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. तसेच नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांनी परस्पर लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये तसेच लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पासनरे यांनी केले आहे.
ही लसीकरण मोहिम १ तारखेपासून ७ तारखेपर्यंत प्रायोगिक स्तरावर राबविली जाणार आहे. दररोज १०० जणांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सांगितले.
चौकट
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्र
तालुका लसीकरण केंद्र
आंबेगाव उपजिल्हा रुग्णालय मंचर
बारामती महिला रुग्णालय, बारामती
भोर उपजिल्हा रुग्णालय
दाैंड उपजिल्हा रुग्णालय
हवेली प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणी काळभोर
इंदापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, पळसदेव
जुन्नर प्राथमिक आरोग्य केंद्र, ओतुर
खेड प्राथमिक आरोग्य केंद्र, राजगुरुनगर
मावळ प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे
मुळशी प्राथमिक आराेग्य केंद्र, माण
पुरंदर ग्रामीण रुग्णालय जेजुरी
शिरूर ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर
वेल्हा ग्रामीण रुग्णालय, वेल्हा
पुणे कँन्टोन्मेंट बोर्ड सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय