दौैंडच्या तिसऱ्या मोरीचे काम लवकरच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:53 AM2018-12-19T00:53:16+5:302018-12-19T00:53:48+5:30
विजयकुमार थोरात : १५ फेब्रुवारीदरम्यान सुरू होणार; जनतेचा श्वास मोकळा होणार
दौैंड : दौंड शहरातील तिसºया रेल्वे कुरकुंभ मोरीच्या कामाला १५ फेब्रुवारीच्या दरम्यान सुरुवात होईल, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली. साधारणत: १0 महिन्यांच्या जवळपास ही कुरकुंभ मोरी होईल, असा एकंदरीत अंदाज असून सदरचे बांधकाम सुरू करण्याची परवानगी संबंधित ठेकेदाराला १५ जानेवारीच्या जवळपास रेल्वे खाते देईल, असे डॉ. विजयकुमार थोरात यांनी स्पष्ट केले.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे कुरकुंभ मोरीतील वाहतुकीच्या कोंडीमुळे शहरातील नागरिक हैैराण झाले होते. मोरीत अपघात होऊन ऐन पावसाळ्यात एका व्यक्तीचा बळी गेला होता. परंतु रेंगाळलेले कुरकुंभ मोरीचे काम सुरू होत आहे. निश्चितच या मोरीत गुदमरत असलेला जनतेचा श्वास मोकळा होणार आहे. सदरच्या मोरीसंदर्भातील कामकाज चार टप्प्यांतील असून, पहिल्या टप्प्यात रेल्वे कुरकुंभ मोरीजवळील हनुमान मंदिराजवळील रेल्वे क्वॉर्टर काढण्यात येणार आहे. तर त्याबदल्यात १0 क्वॉर्टर अन्य रेल्वेच्या जागेत बांधण्यात येणार आहे. हनुमान मंदिराजवळील क्वॉर्टर काढल्यानंतर कुरकुंभ मोरीच्या बांधकामाला मोकळीक मिळेल. दुसºया टप्प्यात मोरीचा बॉक्स कुशीन करण्यात येणार आहे, तर तिसºया टप्प्यात केबल सेटिंग आणि चौैथ्या टप्प्यात विद्युतीकरणाचे काम होणार आहे. दौैंड शहर दोन विभागांत विभागलेले आहे. केवळ रेल्वे कुरकुंभ मोरीअभावी शहराचा विकास खुंटलेला आहे. पावसाळ्यात या मोरीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. एरवीही रोजच वाहतुकीची कोंडी होते. दौैंड शहरामध्ये तिसरी रेल्वे कुरकुंभ मोरी व्हावी म्हणून तत्कालीन आमदार रमेश थोरात, खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याकामी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार १४ फेब्रुवारी २0१४ ला कुरकुंभ मोरीच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. साधारणत: फेब्रुवारी २0१५ पर्यंत तिसरी कुरकुंभ मोरी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या कामाला राजकीय ग्रहण लागले आणि कुरकुंभ मोरीचे काम जवळजवळ चार वर्ष रेंगाळले. २0१४ ला सात कोटी रुपयांचा निधी कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आला होता. तर उर्वरित पाच कोटी निधी वैैशिष्ट्यपूर्ण कामासाठी आला होता. दरम्यान सदरचे पाच कोटी रुपये कोठे वापरायचे या कारणास्तव कुरकुंभ मोरीचे काम रेंगाळलेले असल्याचे समजते. पुढे कुरकुंभ मोरीचे काम रेंगाळत गेले. राज्यात आणि तालुक्यात सत्तांतर झाले. परिणामी सदरचे काम रखडले. त्यानंतर आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मोरीच्या उर्वरित निधीसाठी पाठपुरावा केला. त्यानुसार २0१७ मध्ये ८ कोटी ४४ लाख रुपये निधी आला. एकंदरीत सर्व निधी रेल्वे खात्याकडे वर्ग करण्यात आला असून, दरम्यान सदरच्या कामाची जबाबदारी रेल्वे खात्याने घेतली आहे.
रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम सहा वर्षांपूर्वी मंजूर झालेले आहे. कामाला सुरुवातही झाली होती. नगर परिषदेत नागरिक हित संरक्षण मंडळाची एकहाती सत्ता होती. त्यांनी कुरकुंभ मोरीची रक्कम रेल्वे खात्याकडे देण्याकडे टाळाटाळ केली. तत्कालीन नगराध्यक्षा रेल्वे खात्याकडे देण्यात येणाºया धनादेशावर सह्या करीत नाहीत, असे लेखी पत्र तत्कालीन मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी मला दिले आहे. केवळ राजकीय श्रेय घेण्यासाठी कुरकुंभ मोरीचे काम बंद पाडले. कुरकुंभ मोरीचा निधीदेखील अन्यत्र वापरला.
- रमेश थोरात, माजी आमदार, दौंड
कुरकुंभ मोरीत अडथळा आणला नाही
रेल्वे कुरकुंभ मोरीचे काम सुरू होत आहे. याकामी मला हातभार लावता आला यात मला आनंद आहे. मोरी उभारण्यासाठी सर्वांचे प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हातभार लावले आहेत. मोरीच्या कामात कुठलाही अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. याउलट शेवटच्या टप्प्यातील निधी मिळविण्यासाठी मी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यातील ८ कोटी ४४ लाख रुपये आणण्यासाठी प्रयत्न केले.
- राहुल कुल, आमदार, दौैंड