Pune Crime: तेरा वर्षीय मुलीला दारू पाजून नातेवाईकाकडून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 13:42 IST2022-10-07T13:36:18+5:302022-10-07T13:42:28+5:30
दारू पाजून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस...

Pune Crime: तेरा वर्षीय मुलीला दारू पाजून नातेवाईकाकडून अत्याचार
लोणावळा : नेपाळ येथून लोणावळ्यात आलेल्या कुटुंबातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातीलच व्यक्तीने दारू पाजून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.
शहराजवळील एका गावात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला असून, पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपीने पीडिता तिचा भावाला भाजीपाला खरेदीसाठी बाहेर नेले. त्यांना परिसरात आडभागात नेले. तेथे मुलीला दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करीत आहेत.