एमआयडीसीसह ३0 हजार ग्रामस्थ तहानले

By Admin | Published: April 23, 2016 12:55 AM2016-04-23T00:55:16+5:302016-04-23T00:55:16+5:30

बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा गेल्या ५ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे येथील उद्योगांसमोर गंभीर पाणीसंकट निर्माण झाले

Thirty-four thousand villagers along with MIDC | एमआयडीसीसह ३0 हजार ग्रामस्थ तहानले

एमआयडीसीसह ३0 हजार ग्रामस्थ तहानले

googlenewsNext

बारामती : बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा गेल्या ५ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे येथील उद्योगांसमोर गंभीर पाणीसंकट निर्माण झाले आहे. या परिसरातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची
वेळ आली आहे. उजनी जलाशयाच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे जवळपास १० मोठ्या कंपन्या, त्यांच्यावर अवलंबून असलेले जवळपास ३०० लघुउद्योग अडचणीत आले आहेत.
बारामतीच्या या उद्योगनगरीतील अर्थव्यवस्था पाण्यामुळे धोक्यात आली आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र शनिवारपासून (दि. २३) पाणीपुरवठा सुरळीत होईल,
असा दावा केला आहे. तरीदेखील पाण्याची गंभीर समस्या असताना पाणी उपलब्ध होणार कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
एमआयडीसीतील रहिवासी झोनसह कटफळ, वंजारवाडी, गोजूबावी, रूई, तांदूळवाडी येथील २५ ते ३० हजार नागरिक तहानलेले आहेत. या नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर काही नागरी वसाहती वर्गणी करून टँकरने पाणी विकत घेत आहेत.
सध्या पिण्याच्या पाण्यासाठी उद्योगनगरीतील नागरी वस्त्यांमध्ये जारमधील पाण्याची विक्री जोरदार सुरू आहे. यासह कंपन्यांमध्ये दैनंदिन वापराच्या व पिण्याच्या पाण्यावर मर्यादा आली आहे.
उजनीचे पाणी घेण्यासाठी
चारी खोदून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्याचा आटोकाट प्रयत्न
सुरू आहे. आणखी दीड ते दोन
महिने ही कसरत करावी लागणार आहे, अशी स्थिती या परिसरात
आहे. (प्रतिनिधी)
जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. रस्त्याला आडवे छिद्र घेण्याचे काम सुरू आहे. १५ ते २० दिवसांत जुन्या जलवाहिनीतून पाणी सोडणे बंद होईल. त्यामुळे पाणीचोरीचा प्रश्न मार्गी लागेल. नवीन जलवाहिनीतून प्रतिदिन १६ दक्षलक्ष लिटर पाणीपुरवठा होईल. उजनी जलाशयात पावसाळ्यापर्यंत पुरवठा होईल, एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे उद्योजकांना पाण्याची चिंता नाही. याशिवाय पाणी न देऊ शकणाऱ्या भागात उद्योजकांना विंधनविहीर घेण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र, त्यासाठी भूजल संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पाणीपुरवठा सुरू होऊनदेखील उपयोग होण्याची शक्यता नाही. अजूनही जुन्या जलवाहिनीतून पाणीगळती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उद्या पाणी मिळण्याची शाश्वती नाही. याबाबत पाणी न मिळाल्यास शनिवारी उद्योजकांना घेऊन एमआयडीसी प्रशासनाला जाब विचारण्यात येईल. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. ते रोखण्यावर एमआयडीसीने भर दिला पाहिजे.
- प्रमोद काकडे , अध्यक्ष,
बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजवापरासाठी टँकरने विकतचे पाणी येथील नागरिक घेत आहेत. तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी आम्हाला पोहोचावे लागत आहे. ५ हजार लिटर पाण्यासाठी ६०० ते ७०० रुपये व्यावसायिकांकडून घेतले जात आहे. तर, पैसे भरून देखील सध्या टँकरचे पाणी विकतदेखील मिळत नाही. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. किमान पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यावर एमआयडीसीने उपाय शोधला पाहिजे.
- अण्णा पवळ, एमआयडीसीतील रहिवासी जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही. याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आपण शुक्रवारी (दि. २२) सकाळी भेट घेतली. तसेच, या प्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली. त्याची दखल घेऊन एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले आहे. जलशयातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे केवळ याच काळात प्रलंबित कामे पूर्ण करणे शक्य आहे.
- धनंजय जामदार, अध्यक्ष,
बारामती इंडस्ट्रीअल असोसिएशन

Web Title: Thirty-four thousand villagers along with MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.