पैशाच्या कारणावरून तीस वर्षाच्या युवकावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 08:11 PM2019-09-01T20:11:04+5:302019-09-01T20:19:05+5:30
पैशाच्या कारणावरून तीस वर्षाच्या युवकावर गोळीबार करुन गंभीर केले असल्याची घटना राजगुरुनगर येथील चांडोली फाटा ते कडूस जाणाऱ्या रोडवर घडली आहे.
पुणे : पैशाच्या कारणावरून तीस वर्षाच्या युवकावर गोळीबार करुन गंभीर केले असल्याची घटना राजगुरुनगर येथील चांडोली फाटा ते कडूस जाणाऱ्या रोडवर घडली आहे. निलेश भास्कर टिळे (वय३०, रा रावेत, पिंपरी चिंचवड )असे जखमी युवकाचे नांव आहे. मात्र ही घटना कशावरून घडली घटना घडली याबाबत पोलीस यंत्रणाही नाही ही संभ्रमात आहे याबाबत तक्रार देण्यास अजुन कोणीही पुढे आले नाही.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळे यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा उमेश देशमुख (वय ३६ ) रा. सांगवी पुणे यांच्या मध्यस्थीने आर्यन पूर्ण नाव माहित नाही. (रा. मुंबई ) एका स्कीम मध्ये पैसे गुंतवून जास्त पैसे मिळवून देण्याचा व्यवहार ठरला होता. ठरल्याप्रमाणे जखमी निलेश टिळे यांच्याकडून आर्यन यांनी दहा लाख रुपये घेऊन ते दोन ते तीन महिन्यात १२ लाख देतो असे सांगितले होते.
आर्यन यांनी सांगितल्याप्रमाणे आर्यांनचा निलेश नावाचा माणूस पैसे देण्यासाठी पाठवत असल्याचे सांगितले त्याप्रमाणे पैसे प्रथम रावेत येथे घ्यायचे ठरले नंतर नाशिक येथे ते घ्यायचे ठरले शेवटी सदरचे पैसे हे खेड येथील चांडोली येथे घेण्याचे ठरले शेवटी चांडोली फाटा येथे यांच्या इंडिका कारणे आले त्याठिकाणी ते थांबले असता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आर्यनने पाठवलेला एक व्यक्ती निलेश व त्याच्या सोबत अजून एक इसम काळया रंगाच्या पल्सर मोटरसायकल आले व चांडोली फाटा येथे त्यांचे बोलणे झाले . निलेश सोबत आलेला एक व्यक्ती कारमध्ये बसला उमेश देशमुख आणि निलेश हे चांडोली फाटयावर थांबले. दरम्यान त्या कारमध्ये बसलेल्या तीन सांगितले की एका ऑफिसमध्ये आर्यनने बोलावले असे सांगितले.
त्यानंतर निलेश टिळे त्याचा मित्र राहुल सोनवणे व तो व्यक्ती कारमध्ये बसून थोडे पुढे गेल्यावर ती त्या व्यक्तीने त्यांना कडूस रोडवरील मनुष्य नसलेल्या ठिकाणी नेले व त्याने सोबत आणलेल्या पिस्तुलने निलेश टिळे याला धाक दाखवून दहा लाख रुपये ची बॅग जबरदस्तीने घेऊ लागला सोबत आणलेल्या पिस्तुलने फायर केली असता सदर ची गोळी निलेश टिळे यांच्या कमरेच्या वरती गोळी लागून तो जखमी झाला. व अनोळखी इसम बॅग घेऊन पळून गेला. त्यानंतर राहुल सोनवणे व उमेश देशमुख यांनी जखमी निलेशला प्रथम उपचारासाठी चाकण येथे नेले तेथे त्यांनी डॉक्टरांना सांगितले की शेतात बसून नवीन घेतलेल्या बंदूक खेळत असताना मिस फायर होऊन निलेश जखमी झाला आहे.
खेड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी गजानन टोंम्पे, पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली असता जखमी निलेश टिळे याने प्रथम जमिनीच्या वादातून सदरचा प्रकार घडला असल्याचे सांगितले नंतर पुन्हा विचारले असता त्यांनी वरील प्रमाणे हकिगत सांगितली. हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेले जखमी निलेश यांचे वडील भास्कर टिळे यांनी आम्हाला याप्रकरणी कोणतीही तक्रार करायची नाही असे सांगितले. तसेच जखमी निलेश यांच्याकडे चौकशी केली असता मला बोलण्यास त्रास होत आहे असे सांगून टाळले. जखमी टिळे हा व्यवस्थित बोलू लागल्यानंतर शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नक्की ही घटना कशामुळे घडली त्यामुळे पोलिसही संभ्रमात आहेत याबाबत अजून तक्रार देण्यास कोणी पुढे आले नाही.