Pune: 'मला या महिलेनं मारून टाकण्याचा प्रयत्न केला', पतीचा व्हिडिओ व्हायरल, कात्रीने गळा कापून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:45 IST2025-01-23T13:43:40+5:302025-01-23T13:45:01+5:30
मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत, म्हणून मला तिला मारावं लागलं

Pune: 'मला या महिलेनं मारून टाकण्याचा प्रयत्न केला', पतीचा व्हिडिओ व्हायरल, कात्रीने गळा कापून केला खून
पुणे: घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या नवऱ्याने बायकोच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यांनतर पतीने व्हिडिओ शूट केल्याची माहिती समोर आली आहे. ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. लेन नं. ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी चंदननगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास गीते हा मूळ बीडचा रहिवासी आहे. तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो. तुळजाभवानी नगर येथे तो भाड्याने राहत आहे. गीते नवरा-बायकोत घरगुती कारणावरून भांडणे होत होती. बुधवारी पहाटे देखील याच कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात आरोपी शिवदास याने घरातील कात्रीने ज्योती हिच्या गळ्यावर वार करुन खून केला. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपी शिवदास गीते याला ताब्यात घेत अटक केली. तसेच ज्योती हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये ज्योती (27) ने शिवदास गिते (37) याच्याशी लग्न केले होते. ज्योती शिलाई मशीनद्वारे कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामं करत होती. तर दुसऱ्या बाजूला शिवदास गिते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे स्टेनो म्हणून कार्यरत आहे. या दाम्पत्याला 5 वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा होता. शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा तिच्या चारित्रावर संशय घेत होता आणि यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होते. अखेर त्याने बुधवारी पहाटे झालेल्या भांडणातून पत्नीचा खून केला.
व्हिडिओ मधून काय म्हणाला शिवदास
मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला माराव किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माराव लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत.